Whatsapp Fraudsters Dainik Gomantak
अर्थविश्व

Whatsapp Spam Call: युसर्स रहा सावध! हॅकर्सनी शोधला तुम्हाला लुटण्याचा नवा मार्ग; वाचा एका क्लिकवर

फसवणूक करणाऱ्यांनीही Whatsapp आपला नवा अड्डा बनवला आहे.

दैनिक गोमन्तक

Whatsapp Fraudsters: व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे एक लोकप्रिय मॅसेजिंग अॅप आहे. सर्वच लोक फोनमध्ये वापर करतात. आजच्या काळात, बहुतेक लोक फक्त व्हॉट्सअॅपद्वारेच मॅसेज पाठवुन संपर्क साधतात.

त्यामुळेच फसवणूक करणाऱ्यांनीही तो आपला नवा अड्डा बनवला आहे. हॅकर्स नवीन मार्गाने लोकांना टार्गेट करत आहेत आणि यामुळे अनेक यूजर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

व्हॉट्सअॅपवर आजकाल सर्वात सामान्य घोटाळ्यापैकी एक म्हणजे आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येणे. हे कॉल्स ऑडिओ आणि व्हिडिओ अशा दोन्ही प्रकारे केले जात आहेत.

समोर आलेल्या प्रकरणांपैकी मलेशिया, केनिया आणि व्हिएतनामसारख्या देशांमधून अनेकदा कॉल केले जात आहेत. 

देशाची माहिती दिलेल्या ISD कोडवरून घेतली जाते. या प्रकारचे कॉल वाढत आहेत आणि अनेक लोक स्कॅमरनी त्यांचे फोन नंबर कसे मिळवले याबद्दल चिंतित आहेत.

वास्तविक व्हॉट्सअॅप VoIP नेटवर्कद्वारे कार्य करते, याचा अर्थ असा की लोक कोणत्याही देशातून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कॉल करू शकतात.

या कॉल्सचा अजेंडा अस्पष्ट आहे. परंतु बर्‍याच प्रकरणांमध्ये, स्कॅमर वापरकर्त्यांच्या खात्यांमधून पैसे चोरण्यासाठी वापरू शकतील अशी गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात.

म्हणून, वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि अशा कॉल दरम्यान कोणतीही वैयक्तिक माहिती समोरच्या व्यक्तीला देउ नका.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून तुम्हाला कॉल येतो, तो ISD कोड त्याच देशाचा असणे आवश्यक नाही.

आजकाल अशा एजन्सी आहेत ज्या व्हॉट्सअॅप कॉलसाठी आंतरराष्ट्रीय नंबर विकतात. याचा अर्थ असा आहे की कॉलर फक्त तुमच्या शहरातून कॉल करत असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT