Investment Tips Dainik Gomantak
अर्थविश्व

Investment Tips: 25 ते 30 हजार रुपये पगारात कसे व्हाल करोडपती? हा आहे हिट फॉर्म्युला

कमी पगारात करोडपती होण्याचे कोणते मार्ग आहेत? असे प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असतील तर एक अप्रतिम फॉर्म्युला तुमच्यासाठी उपयोगी पडू शकतो!

गोमन्तक डिजिटल टीम

आजच्या युगात महागाई सातत्याने वाढत असून त्यामुळे लोकांची बचत आणि त्याचे मार्ग कमी - कमी होत चालले आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने जास्त पैसे खर्च करावे लागताहेत. याचा सर्वाधिक परिणाम मध्यमवर्गीय कुटुंबांवर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बचत कशी करायची त्यातून गुंतवणूक कशी करायची? कमी पगारात करोडपती होण्याचे कोणते मार्ग आहेत? असे प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असतील तर एक अप्रतिम फॉर्म्युला तुमच्यासाठी उपयोगी पडू शकतो! 50:30:20 असा हा फॉर्म्युला आहे... त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

50:30:20 फॉर्म्युला काय आहे?

तुम्ही विचार करत असाल की 50:30:20 चा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमचे उत्पन्न तीन भागांमध्ये विभागण्याचे हे सूत्र आहे. यामध्ये फक्त एवढेच करायचे आहे की तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या सॅलरी अकाउंटमध्ये येणाऱ्या पगारावर हा फॉर्म्युला वापरून त्याचे तीन भाग करा. व्यावसायिकही हे करू शकतात. ते तुमच्या मासिक उत्पन्नावर लागू करून तुम्ही चांगली बचत करू शकता.

उदाहरणार्थ, जर आपण दरमहा 30,000 रुपये पगार असलेल्या नोकरी व्यवसायावर हे सूत्र लागू केले, तर पगाराच्या 100 टक्के भाग अशा प्रकारे विभागावा लागेल. 50%+30%+20%= 100%. म्हणजेच तुमचा पगार तीन भागात विभागून घ्या. यानुसार, नंतर तुमच्या पगाराचे 15000+9000+6000 असे तीन भाग असतील.

असे व्हा करोडपती

30,000 रुपये पगारातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच तिसरा भाग जो 20 टक्के आहे, हा हिस्सा 6,000 रुपये होतो. या फॉर्म्युलामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुम्हाला हा छोटा भाग आधी जतन करणे आवश्यक आहे. त्यानंतर ही रक्कम योग्य ठिकाणी गुंतवावी लागेल.

निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, म्युच्युअल फंडामध्ये दर महिन्याला SIP आणि बाँड हे पैसे गुंतवण्याचा सर्वोत्तम पर्याय असेल. 50:30:20 फॉर्म्युल्यानुसार, दरमहा एवढ्या पैशाची बचत केल्यास, तुमचे वार्षिक 72,000 रुपये वाचतील. SIP मध्ये गुंतवणूक केल्याने, तुमची ही बचत वर्षानुवर्षे वाढत जाईल आणि त्यासोबतच त्यावर मिळणाऱ्या व्याजात चक्रवाढ व्याज जोडले जाईल आणि एक फॅट फंड तयार होईल.

अशी आहे आकडेमोड

तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 6000 रुपयांची एसआयपी केली आणि तुमचे उत्पन्न वाढत असताना दरवर्षी 20% गुंतवणुकीत वाढ केली, तर 20 वर्षांनंतर त्या गुंतवणुकीवर 12% दराने एकूण 2,17,45,302 रूपयांची कमाई होईल. तर, 15 टक्के व्याज मिळाल्यास एकूण 3,42,68,292 रुपये मिळतील. या फॉर्म्युल्यावर 20 वर्षे काम करून करोडपती होऊ शकता.

(टीप: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT