Viral Video: 'माझ्या मुलीने तिच्या पतीला ब्रिटनचा पंतप्रधान केले' सुधा मूर्ती यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल

मुर्ती परिवारातील सर्व शुभ कार्य फक्त गुरुवारीच केले जातात आणि त्या दिवशी उपवास केला जातो.
Rishi Sunak Akshata Murthy
Rishi Sunak Akshata MurthyDainik Gomantak
Published on
Updated on

Sudha Murthy Viral Video: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू आणि भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुधा मूर्ती या व्हिडिओमध्ये पत्नी कशा असतात, त्या पतीचे आयुष्य कसे बदलू शकतात याबाबत भाष्य केले आहे.

सुधा मूर्ती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 'मी माझ्या पतीला बिझनेसमॅन बनवले. माझ्या मुलीने तिच्या पतीला ब्रिटनचे पंतप्रधान केले. कारण पत्नीचा महिमा.' असे सुधा मूर्ती या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

ऋषी सुनक यांच्या वैयक्तिक आणि धार्मिक जीवनावर देखील खूप प्रभाव टाकल्याचे सुधा मूर्ती यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मुर्ती परिवारातील सर्व शुभ कार्य फक्त गुरुवारीच केले जातात आणि त्या दिवशी उपवास केला जातो.

'गुरुवारी काय सुरू करायचे... माझ्या पतीने गुरुवारी इन्फोसिस सुरू केली. इतकंच नाही तर आमच्या मुलीशी लग्न करणारा आमचा जावई त्याच्या पूर्वजांच्या काळापासून 150 वर्षांपासून इंग्लंडमध्ये आहे, पण ऋषी खूप धार्मिक आहे.' असे मूर्ती म्हणाल्या.

Rishi Sunak Akshata Murthy
Qatar: हेरगिरी प्रकरणात भारतीय नौदलाच्या 8 अधिकाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा? PAK मीडियाचा खळबळजनक दावा

स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांची भेट झाली. ब्रिटनचे पंतप्रधान 42 वर्षीय ऋषी सुनक यांनी 2009 मध्ये नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी लग्न केले. अक्षता आणि ऋषी सुनक यांना कृष्णा आणि अनुष्का नावाच्या दोन मुली आहेत. अक्षताची इन्फोसिसमध्ये 6,000 कोटी रुपयांची 0.94 टक्के भागीदारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com