Aadhaar Card  Dainik Gomantak
अर्थविश्व

काय आहे, Masked Aadhaar Card; जाणून घ्या त्याचे नेमके फायदे

कार्डधारकाच्या ओळखीची पूर्ण कुंडली या 12 अंकांमध्ये नोंदवली गेली आहे.

दैनिक गोमन्तक

आजकाल प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक बनले आहे. आधार कार्ड हे खऱ्या अर्थाने आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून ओळखला जातो. बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा पासपोर्ट काढण्यासाठी तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर मूळ कागदपत्रांबरोबर आधार कार्डही मागितले जाते. आधार कार्डमध्ये एक 12 अंकी यूनिक नंबर असतो. कार्डधारकाच्या ओळखीची पूर्ण कुंडली या 12 अंकांमध्ये नोंदवली गेलेली असते. आता आधार कार्ड अत्यंत महत्वाचा दस्तऐवज बनला असल्याने, त्याचा वापर आपण अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. यातच आता मास्क्ड आधार कार्ड येऊ लागले आहे. तुमचे सुरुवातीचे 8 क्रमांक मास्क्ड घातलेल्या आधार कार्डमध्ये गुपीत असतात. हे क्रमांक क्रॉस "xxxx-xxxx" ने चिन्हांकित केले जातात. मात्र उर्वरित 4 अकं सर्वांना दिसतात. मास्क्ड घातलेल्या आधार कार्डाचा असा फायदा आहे की, जरी तुमचे आधार कार्ड काही कारणाने हरवले तरी त्याचा कोणीही गैरवापर करु शकणार नाही. तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड मास्क्ड केलेल्या आधार कार्डमध्ये रुपांतरीत करु शकता. हे काम ऑनलाईन पध्दतीने अगदी सहजपणे करता येऊ शकतो. तसेच आपण ते डाउनलोडही करु शकता.

मास्क्ड घातलेले आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल.

जर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक UIDAI मध्ये नोंदणीकृत असेल तर तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड असे डाउनलोड करु शकता-

  • सर्वप्रथम UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर जावे.

  • वेबसाइटवर 'डाउनलोड आधार' पर्यायावर क्लिक करा.

  • आता आधार / व्हीआयडी / नावनोंदणी आयडीचा पर्याय निवडा.

  • मास्क्ड केलेल्या आधारच्या पर्यायावर टीक करावे.

  • येथे आपल्याला काही महत्वाची माहिती प्रविष्ट करावी लागेल.

  • माहिती प्रविष्ट केल्यानंतर, 'विनंती ओटीपी' वर क्लिक करा.

  • तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल.

  • या OTP एंटर करावे.

  • त्यानंतर आणखी काही माहिती इथे नमूद करावी लागले.

  • हे तपशील प्रविष्ट केल्यानंतर, 'आधार डाउनलोड करा'.

  • तुम्ही तुमचे मास्क केलेले आधार डाउनलोड करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT