Fixed Deposit FD Maturity Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

FD Maturity Rules: मुदतपूर्तीनंतर एफडीचे पैसे काढले नाहीत तर काय होते? जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा मोठा नियम

Fixed Deposit FD Maturity Rules: फिक्सड डिपॉझिट हा भारतातील सर्वसामान्यांसाठी नेहमीच गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि अत्यंत विश्वासार्ह मार्ग मानला जातो.

Manish Jadhav

Fixed Deposit Maturity Unclaimed Deposit RBI Rules: फिक्सड डिपॉझिट हा भारतातील सर्वसामान्यांसाठी नेहमीच गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि अत्यंत विश्वासार्ह मार्ग मानला जातो. यामध्ये पैसे बुडण्याची कोणतीही भीती नसते आणि एका ठराविक मुदतीनंतर खात्रीशीर परतावा मिळतो. परंतु, बँकेचा एसएमएस न मिळाल्यामुळे अनेकदा लोक एफडी मॅच्युअर झाल्यानंतर वेळेवर पैसे काढणे विसरतात. जेव्हा एफडीची मुदत संपते आणि तुम्ही बँकेला कोणतेही विशेष निर्देश दिलेले नसतात, तेव्हा बँक तुमच्या आधीच्या पसंतीनुसार कार्यवाही करते.

एफडी काढताना जर तुम्ही ऑटो-रिन्यूअलचा पर्याय निवडला असेल, तर बँक (Bank) मुद्दल आणि मिळालेले व्याज एकत्र करुन तितक्याच कालावधीसाठी पुन्हा नवीन एफडी तयार करते. जर बँकेत ऑटो-क्रेडिटचा नियम सेट असेल, तर मॅच्युरिटीचे संपूर्ण पैसे आपोआप तुमच्या बचत खात्यात जमा होतात. जर कोणतेही निर्देश दिले नसतील आणि पैसे तसेच पडून राहिले, तर रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार त्यावर बचत खात्याचे व्याज किंवा जुन्या एफडीचे व्याज या दोघांपैकी जे कमी असेल, तेच लागू होते.

जर एफडी मॅच्युरिटीनंतर सलग 10 वर्षांपर्यंत कोणीही ते पैसे काढले नाहीत, तर बँकिंग नियमांनुसार तो पैसा 'अनक्लेम्ड डिपॉझिट' म्हणून घोषित केला जातो. त्यानंतर बँक ही संपूर्ण रक्कम रिझर्व्ह बँकेच्या 'डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस' फंडमध्ये वर्ग करते. याचा अर्थ तुमचे पैसे बुडाले असे अजिबात नाही, तर आरबीआय केवळ तुमच्या पैशांची संरक्षक बनते. जेव्हा तुम्ही किंवा तुमचा कायदेशीर वारसदार योग्य कागदपत्रे दाखवून दावा करतो, तेव्हा संपूर्ण पैसे व्याजासह परत मिळतात. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदार मृत्यू प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दाखवून बँकेतून सहजपणे संपूर्ण रक्कम घेऊ शकतात.

एफडी पूर्ण झाल्यावर ती पुन्हा रिन्यू करावी की पैसे काढून घ्यावेत, याबाबत निर्णय घेताना तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे, जुन्या एफडीवर मिळणारा व्याजदर आणि बँकेचे सध्याचे नवीन व्याजदर यांची तुलना करावी. जर बँक आता जास्त व्याज देत असेल, तर एफडी रिन्यू करणे फायद्याचे ठरते. दुसरी गोष्ट म्हणजे, भविष्यातील गरजेनुसार तरलता तपासावी. जर नजीकच्या काळात पैशांची गरज भासणार असेल, तर पैसे दीर्घ मुदतीच्या एफडीमध्ये पुन्हा लॉक करु नयेत. त्याऐवजी पैसे बचत खात्यात ठेवणे किंवा वेगवेगळ्या मुदतीचे छोटे गट तयार करणे अधिक शहाणपणाचे ठरते. तिसरी गोष्ट म्हणजे, भविष्यात कधी आपत्कालीन परिस्थितीत मुदतीपूर्वी पैसे काढावे लागल्यास बँक किती दंड किंवा पेनल्टी आकारेल, याची पूर्ण माहिती आधीच करुन घ्यावी.

ICC Ranking मध्ये मोठी उलथापालथ! इशान किशनला मागे टाकत अभिषेक शर्मा टी-20चा नवा किंग; पटकावले अव्वल स्थान

Nigeria Crime: जीव वाचवण्यासाठी लोकांनी नदीत घेतल्या उड्या, बंदूकधाऱ्यांचा हैदोस! नायजेरियातील भीषण हल्ल्यात 62 जणांचा मृत्यू; हजारो बेघर

Goa Agriculture News: डिचोलीत भातकापणीला वेग; अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता

Neeraj Yadav Demise: भारतानं गमावला हिरा! तीन वेळचा पॅरा आशियाई सुवर्णपदक विजेता नीरज यादवचं निधन; विष प्राशन करुन संपवलं जीवन

POCSO Case Quashed: पॉक्सो गुन्हा आणि आरोपपत्र रद्द; याचिकाकर्ता व पीडित कुटुंबीयांना 3 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT