SBI Cyber Attack: देशातील सर्वात मोठ्या बँकेवर सायबर हल्ला! 3897 ग्राहकांचा प्रायव्हेट डेटा डार्क वेबवर लीक; तुमचा डेटा सुरक्षित आहे का?

SBI Cyber Attack: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियावर एक मोठा सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
SBI Cyber Attack
SBI Cyber AttackDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

SBI Cyber Attack: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियावर मोठा सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बँकेने स्वतः या सायबर हल्ल्याची अधिकृत पुष्टी केली असून, या हल्ल्यानंतर सुमारे 3897 ग्राहकांचा प्रायव्हेट डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचे स्पष्ट झाले. लीक झालेल्या या डेटाबेसमध्ये ग्राहकांची (Customer) नावे, फोन नंबर, जन्म तारीख आणि लोनशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे समाविष्ट आहेत.

स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या अधिकृत माहितीत बँकेने नमूद केले की, डार्क वेबवर आढळलेल्या सुमारे 3.75 लाख रेकॉर्ड्सच्या प्राथमिक तपासणीनंतर जवळपास 3897 ग्राहकांच्या प्रायव्हेट डेटाची सुरक्षा धोक्यात आल्याचे निष्पन्न झाले.

SBI Cyber Attack
Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर रोजी थ्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस प्रोव्हायडर, डिफेन्स सायबर एजन्सी आणि भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून डेटा लीक होण्याची शक्यता वर्तवणारा अलर्ट मिळाला होता. हा संदेश मिळताच बँकेने तातडीने आपली सायबर इन्सिडेंट रिस्पॉन्स आणि सुरक्षा यंत्रणा कामाला लावली.

SBI Cyber Attack
SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

प्राथमिक तपासात उघड झाले की, लीक झालेल्या डेटामध्ये ग्राहकांचे नोंदणीकृत मोबाईल नंबर, पूर्ण नाव, लिंग, ईमेल आयडी, घरचा पत्ता, जन्मतारीख आणि ब्रॅंच कोड यांचा समावेश आहे. याशिवाय, लोन अकाऊंटशी संबंधित फायली आणि कस्टमर इन्फॉर्मेशन फाईलचे रेकॉर्ड्स देखील या सायबर चोरांच्या हाती लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

SBI Cyber Attack
Fake Call Scam: यू आर अंडर अरेस्ट... तुम्हालाही असे कॉल आलेत का? वेळीच व्हा सावध; SBI कडून अलर्ट जारी

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना बँकेने स्पष्ट केले की, या सायबर हल्ल्याचा बँकेच्या मुख्य बँकिंग ऑपरेशन्स आणि आर्थिक स्थितीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. एसबीआयचे सर्व कोर बिझनेस फंक्शन्स सुरळीत आणि विनाअडथळा सुरु आहेत. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव CERT-In शी संलग्न एका स्वतंत्र सायबर सुरक्षा एजन्सीला देखील संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आणि धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.

SBI Cyber Attack
Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

SBIयाआधी ‘Siriusim’ नावाच्या एका अज्ञात हॅकर ग्रुपने ‘BreachForums’ वर एसबीआयच्या लाखो ग्राहकांचा डेटा चोरल्याचा दावा केला, मात्र बँकेने आपल्या निवेदनात कोणत्याही विशिष्ट हॅकर ग्रुपचा थेट उल्लेख टाळला असून, बँक परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com