Volkswagen factory workers affected by major job cuts and restructuring Dainik Gomantak
अर्थविश्व

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Volkswagen Group 100k Job Cuts: वैश्विक ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मंदावलेली मागणी आणि चिनी कार उत्पादकांकडून मिळणाऱ्या स्पर्धेमुळे जर्मन ऑटो दिग्गज 'फॉक्सवॅगन ग्रुप'ने एक ऐतिहासिक आणि धक्कादायक निर्णय घेतला.

Manish Jadhav

Volkswagen Group 100k Job Cuts: वैश्विक ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मंदावलेली मागणी आणि चिनी कार उत्पादकांकडून मिळणाऱ्या स्पर्धेमुळे जर्मन ऑटो दिग्गज 'फॉक्सवॅगन ग्रुप'ने एक ऐतिहासिक आणि धक्कादायक निर्णय घेतला. कंपनीच्या बोर्डाने एका व्यापक 'टर्नअराउंड प्लॅन'ला मंजुरी दिली असून जगभरात तब्बल 1 लाख कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. युरोपमधील वाढता उत्पादन खर्च, क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन आणि ईव्ही ट्रान्सिशनमध्ये येणाऱ्या प्रचंड आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. जागतिक ऑटोमोबाईल उद्योगाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात मानली जात आहे.

फॉक्सवॅगन व्यवस्थापन आणि युनियन यांच्यात या दशकाच्या अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने 1,00,000 नोकऱ्या कमी करण्यावर सहमती झाली आहे. कंपनीने आधीच ठरवलेल्या 50,000 कपातीव्यतिरिक्त आणखी 50,000 नोकऱ्या कमी करण्याच्या योजनेला मंजुरी दिली. ऑडी आणि पोर्श यांसारख्या 10 मोठ्या ब्रँड्सचा समावेश असलेला हा ग्रुप आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे.

अमेरिकेचे टॅरिफ, ईव्ही वाहनांची घसरलेली मागणी आणि विशेषतः चीनकडून मिळणारे मोठे आव्हान यामुळे युरोपमधील ही सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. ही 1 लाख कर्मचाऱ्यांची कपात फॉक्सवॅगनच्या जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 15 टक्के आहे, जी 2009 मध्ये जनरल मोटर्सने केलेल्या 50,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीपेक्षाही मोठी आहे.

या कपातीमुळे जर्मनीतील (Germany) हॅनोव्हर, एमडेन, झ्विकाऊ आणि नेकरसल्म या चार मोठ्या कारखान्यांच्या दीर्घकालीन भविष्याची कोणतीही शाश्वती देता येत नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. जर हे कारखाने बंद झाले, तर फॉक्सवॅगनच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांच्या मायभूमीत चालू कारखाने बंद करण्याची वेळ येईल. या निर्णयावरुन कामगार युनियन आणि व्यवस्थापनात तीव्र मतभेद समोर आले होते.

कामगार युनियनने व्यवस्थापनावर अपारदर्शकतेचा आरोप केला होता, परंतु अखेर कंपनीच्या सुपरवायझरी बोर्डाने या योजनेला मंजुरी दिली. लोअर सॅक्सनी राज्य आणि कामगार प्रतिनिधींच्या मध्यस्थीमुळे काही प्रमाणात मार्ग निघाला असला, तरी कोणत्याही प्लांटला पूर्णपणे मंजुरीशिवाय बंद केले जाणार नाही असा दावा युनियनने केला. मात्र, या प्रचंड कपातीमुळे ऑटो जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT