Company Layoffs 2026: भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 'या' अमेरिकन कंपनीने भारतातून गुंडाळला गाशा; शेकडो कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार

Opendoor Shuts Down India Operations: अमेरिकेतील प्रसिद्ध डिजिटल रियल एस्टेट कंपनी 'ओपनडोअर' भारतातून आपले कामकाज पूर्णपणे बंद करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
Opendoor Shuts Down India Operations
Company Layoffs 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Opendoor Shuts Down India Operations: जागतिक मंदी आणि कंपन्यांच्या अंतर्गत धोरणात्मक बदलांमुळे आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरकपातीचे सत्र थांबताना दिसत नाही. यातच आता अमेरिकेतील प्रसिद्ध डिजिटल रियल एस्टेट कंपनी 'ओपनडोअर' भारतातून आपले कामकाज पूर्णपणे बंद करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कंपनीच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भारतात काम करणाऱ्या अंदाजे 250 कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागणार आहेत.

'ओपनडोअर'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काज नेजॅटियन यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक भावुक नोट शेअर करत या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. कंपनी आपल्या 'बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन स्ट्रॅटेजी' म्हणजेच व्यावसायिक बदल धोरणावर काम करत असून, त्याअंतर्गत हे ऑपरेशनल रोल्स आता अमेरिकेतील मुख्य ग्राहकांच्या जवळ नेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Opendoor Shuts Down India Operations
TCS Layoff: टीसीएसचे कर्मचारी चिंतेत! तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; नेमकं कारण काय?

सीईओ काज नेजॅटियन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "आज अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही भारतात काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना निरोप देण्यास सुरुवात केली, कारण आम्ही भारतातील आमचे सर्व ऑपरेशन्स बंद करत आहोत." हे सांगतानाच त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकला की, हा निर्णय भारतातील (India) टीमच्या कामगिरीवर आधारित नाही. भारतातील कर्मचारी अत्यंत हुशार, मेहनती आणि व्यावसायिक दृष्ट्या सक्षम आहेत, अशा शब्दांत त्यांनी भारतीय टीमच्या अमूल्य योगदानाचे तोंडभरुन कौतुक केले.

तसेच, हे सर्व कर्मचारी कोणत्याही दुसऱ्या कंपनीसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे सिद्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केवळ कंपनीच्या भौगोलिक आणि धोरणात्मक बदलांमुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

Opendoor Shuts Down India Operations
Layoff: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 46 कंपन्यांकडून नोकर कपात, 7500 आयटी कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या

अचानक नोकरी गेल्यामुळे अडचणीत आलेल्या या 250 भारतीय कर्मचाऱ्यांना कंपनीकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन सीईओ यांनी दिले. प्रभावित झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी 'ट्रांजिशन सपोर्ट' दिला जाईल, ज्यामध्ये आकर्षक सेवरन्स पॅकेज, नवीन नोकरी शोधण्यासाठी आउटप्लेसमेंट सर्व्हिस आणि इतर आवश्यक संसाधनांचा समावेश आहे.

Opendoor Shuts Down India Operations
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, कंपनी 11,000 लोकांना देणार नारळ!

तसेच, भारतातील मुख्य काम अमेरिकेत यशस्वीरित्या ट्रांजिशन होईपर्यंत काही कर्मचारी पुढील काही काळासाठी कंपनीसोबत काम करत राहतील, जेणेकरुन ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल. एका नामांकित अमेरिकन डिजिटल रियल एस्टेट कंपनीने अचानक भारतातून गाशा गुंडाळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com