vf6 and vf7 Dainik Gomantak
अर्थविश्व

Electric Car: टाटा-महिंद्राचं वाढलं टेन्शन, 'ही' कंपनी 2 शानदार इलेक्ट्रिक कारसह भारतीय मार्केटमध्ये करणार एन्ट्री!

Electric Car VF6 And VF7: व्हिएतनामची कार कंपनी विनफास्ट लवकरच भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी याबाबत घोषणा केली होती. जानेवारीमध्ये 2025 च्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये आपले प्रोडक्ट सादर केले होते.

Manish Jadhav

व्हिएतनामची कार कंपनी विनफास्ट लवकरच भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी याबाबत घोषणा केली होती. जानेवारीमध्ये 2025 च्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये आपले प्रोडक्ट सादर केले होते. आता कंपनी भारतात एन्ट्रीसाठी सज्ज झाली आहे. कंपनी भारतात 2 इलेक्ट्रिक कार लॉन्च करेल, ज्यात VF7 आणि VF6 यांचा समावेश आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही व्हिएतनाममध्ये डिझाईन आणि विकसित केल्या गेल्या आहेत, परंतु भारतीय कारप्रेमींच्या अपेक्षेनुसार त्यामध्ये काही बदल केले जातील. दोन्ही कारची विक्री जूनमध्ये सुरु होईल, असे कंपनीने सांगितले.

दरम्यान, विनफास्ट भारतात (India) आपला बिजनेस सुरु करण्यासाठी सज्ज झाली. कंपनी तामिळनाडूमधील आपला प्लांट पुढील आठवड्यात कार्यान्वित करेल. त्याची सुरुवातीची क्षमता दरवर्षी 50,000 युनिट्स असेल. हा प्लांट स्थानिक पातळीवर विनफास्ट व्हीएफ7 आणि व्हीएफ6 असेंबल करेल, जे ब्रँडचे भारतातील पहिले मॉडेल असतील.

VF7 इलेक्ट्रिक कारची खासियत

VF7 ही एक प्रीमियम SUV आहे, जी मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये येईल. तसेच, ती मोठी आणि प्रीमियम असेल. डिझाइन V-थीम असलेल्या LED DRLs, स्प्लिट LED हेडलॅम्प आणि बंपरवर सिल्व्हर गार्निशसह मोठे एअर इनटेक असलेल्या इतर VinFast मॉडेल्ससारखेच आहे. कारमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स असून त्याची लांबी 4.5 मीटर आहे. VF7 एका चार्जवर सुमारे 450 किमीची रेंज जाते. याशिवाय, त्यात लेदरेट अपहोल्स्ट्री, अॅम्बियंट लाइटिंग, पॅनोरॅमिक सनरुफ, लेव्हल 2 ADAS आणि बरेच आकर्षक फीचर्स असतील.

VF6 अधिक खास असणार

VinFast VF6 ही कंपनीची खास पेशकश असेल. या मॉडेलची लांबी सुमारे 4.2 मीटर आहे, जी ती Hyundai Creta Electric, Tata Curve EV, Mahindra XUV400 कारच्या सेगमेंटमध्ये येते. या मॉडेलला पॉवर देणारी एकच मोटर असेल, जी 201 bhp आणि 310 Nm जनरेट करते. जागतिक स्तरावर VinFast 172 bhp आणि 250 Nm सह VF6 Eco व्हेरिएंट देखील विकते. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 59.6 kWh बॅटरी पॅक मिळते, जी एका चार्जवर 399 किमी (इको) आणि ३381 किमी रेंज जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT