Mahindra Electric Car: महिंद्राच्या 'या' इलेक्ट्रिक कारची क्रेझ! मार्केटमध्ये घालतायेत धुमाकूळ; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् रेंज

Mahindra XEV 9e and BE 6 Electric SUVs See Huge Demand: महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9e आणि BE 6 या दोन्ही वाहनांनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. कंपनीने अलीकडेच माहिती दिली की, त्यांनी या वाहनांच्या 3000 हून अधिक युनिट्सची डिलिव्हरी केली आहे.
Mahindra XEV 9e and BE 6 Electric SUVs
Mahindra Electric CarDainik Gomantak
Published on
Updated on

महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9e आणि BE 6 या दोन्ही वाहनांनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. कंपनीने अलीकडेच माहिती दिली की, त्यांनी या वाहनांच्या 3000 हून अधिक युनिट्सची डिलिव्हरी केली आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक कारची मागणी इतकी प्रचंड आहे की आता या वाहनांचा वेटिंग पिरियडही वाढला आहे. जर तुम्ही XEV 9e किंवा BE 6 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तात्काळ बुकिंग करा. मात्र बुक केली तरी कारच्या डिलिव्हरीसाठी किती वेळ वाट पहावी लागेल हे सांगता येत नाही.

प्रतीक्षा कालावधी किती?

महिंद्रा XEV 9e आणि BE 6 या दोन्ही वाहनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 59 टक्के ग्राहकांना XEV 9e आणि 41 टक्के ग्राहकांना (Customers) BE 6 आवडत आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, बहुतेक ग्राहक प्रीमियम पॅक थ्री व्हेरिएंट निवडत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यावरुन असे दिसून येते की, लोकांना कारमध्ये उपलब्ध असलेले फ्लॅगशिप फीचर्स आवडत आहेत. काही राज्यांमध्ये या वाहनांचा प्रतीक्षा कालावधी 6 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे.

Mahindra XEV 9e and BE 6 Electric SUVs
Maruti Suzuki Electric Car: क्रेटा इलेक्ट्रिकला देणार टक्कर! मारुतीची नवी इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात, फिचर्स, मायलेज आणि किंमत जाणून घ्या

Mahindra XEV 9e Range

महिंद्रा XEV 9e मध्ये 79kWh बॅटरी आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर ही इलेक्ट्रिक SUV 659 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते, परंतु या कारची रियल वर्ल्ड रेंज 500 किमी पेक्षा जास्त आहे. ही कार 59 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पर्यायात देखील खरेदी करता येते. हा व्हेरिएंट एका चार्जवर 542 किलोमीटरपर्यंतची रेंज देतो. या इलेक्ट्रिक कारची किंमत 21 लाख 90 हजार रुपये (एक्स-शोरुम) ते 30 लाख 50 हजार रुपये (एक्स-शोरुम) पर्यंत आहे.

Mahindra XEV 9e and BE 6 Electric SUVs
Hydrogen Electric Car: 700 किमी रेंज, 5 मिनिटांत होणार रिफिल; Hyundai ची जबरदस्त हायड्रोजन इलेक्ट्रिक कार लॉन्च

Mahindra BE 6 Range

महिंद्रा कंपनीच्या या इलेक्ट्रिक वाहनात 79 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे, जी एका चार्जवर 682 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. याशिवाय, या कारचा 59 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी व्हेरिएंट पूर्ण चार्ज केल्यावर 557 किलोमीटरपर्यंत धावू शकतो. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 18 लाख 90 हजार रुपये (एक्स-शोरुम) ते 26 लाख 90 हजार रुपये (एक्स-शोरुम) पर्यंत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com