Vaishno Devi Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: वैष्णोदेवीला जाणाऱ्या करोडो भाविकांसाठी रेल्वेची खास भेट, आजपासून सुरु झाली 'ही' नवी सुविधा

Indian Railways Update: वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी मोठी भेट दिली आहे.

Manish Jadhav

Indian Railways Update: वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी मोठी भेट दिली आहे. आता वैष्णोदेवीला जाण्यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना वेळोवेळी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. आज म्हणजेच 26 मे पासून रेल्वेने प्रवाशांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. रेल्वेने नेमकी काय घोषणा केली आहे ती जाणून घ्या...

ट्रेन नंबर नोंद करुन घ्या

भारतीय रेल्वेने वाराणसीहून (Varanasi) जम्मू तवीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन आजपासून म्हणजेच 26 मे पासून धावणार आहे, त्यानंतर तुमचा वैष्णोदेवीचा प्रवास अधिक सुकर होईल.

ट्रेनचा क्रमांक जाहीर करताना, रेल्वेने म्हटले आहे की, प्रवाशांच्या सोयीसाठी, आजपासून ट्रेन क्रमांक 04662/04661 चे ऑपरेशन सुरु झाले आहे.

अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली

माहिती देताना, रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, 26 मे रोजी ट्रेन क्रमांक 04662 जम्मू तवी येथून रात्री 11:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी रात्री 10:55 वाजता वाराणसी कॅंट स्थानकावर पोहोचेल.

वाराणसी कॅन्ट येथून ट्रेन उपलब्ध असेल.

याशिवाय, प्रवाशांना बदल्यात ट्रेन क्रमांक 04661 ने प्रवास करावा लागेल. ही ट्रेन वाराणसी कॅन्टमधून प्रवाशांना (Passengers) भेटेल आणि सकाळी 7:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:15 वाजता जम्मू तवीला पोहोचेल.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या ट्रेनमध्ये प्रवाशांना एसी, स्लीपर तसेच जनरल कोचची सुविधा मिळणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ही ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

मार्गावर नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु आहे

28 ते 30 मे दरम्यान जम्मू तावी एक्स्प्रेस ट्रेन वाराणसी कॅंटला येणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. फिरोजपूर विभागात सुरु असलेल्या नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे ही ट्रेन पठाणकोट येथेच थांबवली जाईल. या नॉन इंटर लॉकिंग कामामुळे जम्मूतावी स्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर गाड्यांची मदत घ्यावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT