Uttar Pradesh Pension Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Uttar Pradesh Pension Hike: उत्तर प्रदेशातील 1 कोटी 21 लाखांहून अधिक पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. योगी सरकार राज्यातील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याच्या तयारीत आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Pension Hike 2026: उत्तर प्रदेशातील 1 कोटी 21 लाखांहून अधिक पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आली. योगी सरकार राज्यातील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याच्या तयारीत आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले कर्मचारी, निराश्रित महिला आणि दिव्यांगजनांच्या मासिक पेन्शनमध्ये थेट 1000 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, आता केवळ मंत्रिमंडळाच्या मंजुरीची औपचारिकता बाकी आहे.

आगामी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव अधिकृतपणे मांडून पास केला जाईल आणि मंजुरी मिळताच याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील 1.21 कोटींहून अधिक पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

याआधी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) 2017 मध्ये पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली होती, ज्यावेळी पेन्शन 500 रुपयांवरुन वाढवून 1000 रुपये प्रतिमहिना करण्यात आली होती. मात्र, यावेळी पेन्शनमध्ये थेट 1500 रुपयांपर्यंत वाढ करण्याची योजना आखण्यात आली. यासाठी आगामी डिसेंबर महिन्यात सादर होणाऱ्या दुसऱ्या पुरवणी अर्थसंकल्पात योग्य त्या निधीची तरतूद केली जाऊ शकते. वित्तीय वर्ष 2026-27च्या तिसऱ्या तिमाहीपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही वाढीव पेन्शन जमा होण्यास सुरुवात होऊ शकते.

विशेष म्हणजे, याआधीही योगी सरकारने विविध घटकांसाठी महत्त्वाचे पावले उचलत आंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ केली होती. तसेच, आगामी 6 महिन्यांच्या आत राज्यातील एक लाख तरुणांना सरकारी नोकरीचे नियुक्ती पत्र देण्याची जोरदार तयारीही सरकार करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT