Shadi Anudan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

Shadi Anudan Yojana: मुलीच्या लग्नासाठी सरकार देतेय 51 हजार रुपये, जाणून घ्या कसा मिळवायचा लाभ?

UP Govt Scheme For Marriage: गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात.

Manish Jadhav

UP Govt Scheme For Marriage: गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात.

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. यांपैकी एक योजना यूपी सरकार चालवत आहे, ज्याचे नाव 'शादी अनुदान योजना' (UP Shadi Anudan Yojana) आहे.

दरम्यान, मुलीचे वय 18 किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा या योजनेसाठी अर्ज करता येईल. तसेच ज्या मुलाचे लग्न (Marriage) करायचे आहे, त्याचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

एका कुटुंबातील दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत सर्व वर्गातील कुटुंबातील मुलींचा समावेश करण्यात आला आहे.

दुसरीकडे, योजनेच्या तीन अटी आहेत. पहिली म्हणजे अर्जदार हा उत्तर प्रदेशचा कायमचा रहिवासी असावा. दुसरी वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 46800 रुपये आणि शहरी भागासाठी 56400 रुपयांपेक्षा जास्त नसावे.

तिसरी अट म्हणजे अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती असावा. अर्जदाराकडे यूपीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जदाराला त्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तसेच लग्न करणाऱ्या जोडप्याचे वय प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

त्याचबरोबर, अर्जदाराचे सरकारी बँकेत खाते असावे. त्यामुळे त्यांना अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करता येणार आहे. हे खाते फक्त सरकारी बँकेत (Bank) असावे.

अर्जदार ओबीसी/एससी/एसटी प्रवर्गातील असल्यास त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इतर प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक नाही.

तसेच, सरकारने दिलेली रक्कम अर्जदार त्याच्या मुलीचे लग्न झाल्यावरच काढू शकतो. लग्नाच्या 90 दिवस आधी किंवा 90 दिवसांनी अर्ज करता येईल.

शिवाय, योजनेचा लाभ घेण्यासाठी यूपी सरकारच्या shadianudan.upsdc.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर नवीन नोंदणीच्या पर्यायाखाली, तुम्हाला जातीनुसार खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक निवडावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT