Sukanya Samriddhi Yojana मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, आता मुलींना मिळणार 65 लाख रुपये; जाणून घ्या

Central Government Scheme: तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या चिंतेतून तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हावे, यासाठी सरकारने तुमच्या मुलीसाठी योजना लागू केली आहे.
Money
Money Dainik Gomantak

Sukanya Samriddhi Yojana 2023: सरकार वेळोवेळी नागरिकांच्या सोयीसाठी अशा अनेक योजना राबवत असते, जिथे तुमचा पैसा सुरक्षित राहतो आणि तुम्हाला उत्कृष्ट परतावाही मिळतो.

तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या चिंतेतून तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हावे, यासाठी सरकारने तुमच्या मुलीसाठी योजना लागू केली आहे. सुकन्या समृद्धी योजना असे या योजनेचे नाव आहे.

या योजनेत तुम्हाला फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर 65 लाख रुपये मिळतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपाउंडिंगचा फायदाही मिळतो. चला तर मग या योजनेबद्दल जाणून घेऊया...

सुकन्या समृद्धी योजना काय आहे?

सुकन्या समृद्धी योजना ही सरकारने (Government) बनवलेली योजना आहे, ही योजना खास तुमच्या लाडक्या मुलीसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करु शकता. या योजनेत तुम्ही अल्प रकमेमध्ये खाते उघडू शकता, तुम्ही खाते उघडून तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे थोडे थोडे पैसे जमा करु शकता.

Money
Sukanya Samriddhi Yojana बाबत लोकांचा अपेक्षाभंग, अर्थसंकल्पानंतर ही माहिती आली समोर

कोण अर्ज करु शकतो

सुकन्या समृद्धी योजनेत, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते तिचे पालक उघडू शकतात. यामध्ये तुम्ही फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीने (Investment) खाते उघडू शकता.

तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. यामध्ये तुम्हाला 7.6 टक्के दराने व्याज मिळते. मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.

एका कुटुंबात फक्त 2 मुलींची खाती उघडली जाऊ शकतात, जुळ्या/तिहेरी मुलींसाठी 2 पेक्षा जास्त खाती उघडता येतात.

किती व्याज मिळत आहे

सुकन्या समृद्धी योजनेवर मिळणारे व्याज सरकार ठरवते. यामध्ये तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळते. या योजनेत तुम्ही कमाल 1.50 लाख रुपये जमा करु शकता.

मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यावरच तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता. यामध्ये तुम्हाला आयकरातही सूट मिळते.

Money
Sukanya Samriddhi Yojana त गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थमंत्री करणार घोषणा!

65 लाख रुपये कसे मिळतील

जर तुम्ही या योजनेत दररोज 250 रुपये गुंतवले तर तुम्ही एका महिन्यात 12,500 रुपये जमा करता आणि एका वर्षात तुम्ही 22.50 लाख रुपये गुंतवता.

15 वर्षांनंतर म्हणजेच तुमच्या मुलीच्या मॅच्युरिटीच्या 21 व्या वर्षी तुम्हाला 65 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला सुमारे 41.15 लाख रुपयांचे व्याज मिळेल.

Money
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत सरकारने केले 5 मोठे बदल, माहित नसेल तर...

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1. आई आणि वडिलांचे ओळखपत्र

2. मुलीचे आधार कार्ड

3. मुलीच्या नावाने उघडलेले बँक खाते पासबुक

4. मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो

5. मोबाईल क्रमांक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com