Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता; केंद्र सरकारची योजना

7व्या वित्त आयोगानुसार DA वर्षातून दोनदा वाढवला जातो.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढत्या महागाईतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जुलैमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पुन्हा एकदा महागाई भत्ता (DA) वाढवू शकते. यावेळीही 3 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो. सरकारने तसे केल्यास 1 कोटींहून अधिक लोकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळेल. (Union government may increase Dearness Allowance in July)

DA वर्षातून दोनदा वाढतो
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी, त्यांच्या पगार/पेन्शनमध्ये DA घटक जोडण्यात आला आहे. 7व्या वित्त आयोगानुसार (7वा वेतन आयोग) DA वर्षातून दोनदा वाढवला जातो. प्रथम महागाई भत्ता जानेवारीमध्ये वाढविला जातो आणि दुसरी सुधारणा जुलैमध्ये होते. सरकार हा निर्णय महागाई दराच्या आधारे घेते. मार्चमध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाल्याने, लोकांना अपेक्षा आहे की जुलैमध्ये महागाई भत्ता पुन्हा 3 टक्क्यांनी वाढेल.

'या' लोकांना तात्काळ दिलासा मिळेल
सरकारने या वर्षात एकदाच महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. जुलैमध्ये त्यात पुन्हा वाढ केल्यास डीए 37 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जुलैमध्ये पुन्हा महागाई भत्ता वाढवला तर 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT