Union Budget 2026 Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2026: काय स्वस्त झाले, काय महाग? अर्थसंकल्पातील मोठे बदल पहा एका क्लिकवर..

Union Budget 2026: अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, उद्योगजगत तसेच निर्यातीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

Sameer Panditrao

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, उद्योगजगत तसेच निर्यातीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातील दिलासादायक बाब म्हणजे चामड्याचे बूट, कपडे आणि त्यांचा निर्यात खर्च कमी होणार आहे. यासोबतच मायक्रोवेव्ह ओव्हन, सौरऊर्जेशी संबंधित साहित्य, कर्करोगावरील काही औषधेही स्वस्त होणार आहेत.

मात्र दुसरीकडे, दारू महाग होण्याचे संकेत या अर्थसंकल्पातून मिळाले आहेत. तसेच खनिजे, स्क्रॅप आणि लक्झरी वस्तूंवरील खर्चात वाढ होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन आयकर कायदा लागू होणार असला, तरी यंदाच्या अर्थसंकल्पात करसवलतीबाबत कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही.

अर्थसंकल्पात शेती, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात आले असून, ‘विकसित भारत २०४७’ या दीर्घकालीन उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिका टॅरिफ धोरणांमुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता लक्षात घेता, हा अर्थसंकल्प विशेष ठरतो.

काय महाग होणार?

खनिजे, स्क्रॅप, मद्य, लक्झरी घड्याळे व लक्झरी वस्तू.

काय स्वस्त होणार?

चामड्याचे बूट, कपडे, सिंथेटिक फुटवेअर, परदेश प्रवासाशी संबंधित काही बाबी, कर्करोगावरील १७ औषधे, मायक्रोवेव्ह ओव्हन, विमाननिर्मितीशी संबंधित साहित्य, ई-व्ही बॅटऱ्या, मधुमेहावरील औषधे, बायोगॅस मिश्रित सीएनजी, सोलर ग्लास तसेच विमानांचे इंधन.

एकूणच, काही वर्गांना दिलासा देणारा तर काही घटकांसाठी खर्च वाढवणारा असा हा अर्थसंकल्प ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT