Aadhaar Card
Aadhaar Card Dainik Gomantak
अर्थविश्व

UIDAI ने आधार कार्डबाबत दिले हे मोठे अपडेट, करोडो लोकांवर होणार परिणाम

दैनिक गोमन्तक

Aadhaar Card Update: ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. आजच्या काळात सर्व लोकांकडे आधार क्रमांक आहे. त्याद्वारे आपण आपले सरकार आणि बँकेशी संबंधित सर्व कामे करतो. आजकाल घरपोच गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी देखील आधार क्रमांक आवश्यक आहे, त्यामुळे आधार कार्ड संबंधित सर्व माहिती गरजेची राहते.

UIDAI ने ट्विट केले आहे

UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमचा आधार OTP आणि पर्सनल माहिती कधीही कोणाला सांगू करु नका. तुम्हाला UIDAI कडून आधार OTP विचारणारा कॉल, एसएमएस किंवा ईमेल कधीही प्राप्त होणार नाही. त्यामुळे अशी माहिती कोणाशीही शेअर करु नका.

UIDAI ने अलर्ट जारी केला

आजच्या काळात बँकेपासून (Bank) पोस्ट ऑफिसपर्यंत, जिथे-जिथे तुम्ही तुमचे अकाऊंट ओपन करुन ठेवले आहेत... तिथे जर लिंक असेल तर फसवणुकीच्या घटनांमध्येही खूप वाढ होत आहे. अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी UIDAI कडून वेळोवेळी सामान्य जनतेसाठी अलर्ट जारी केले जातात.

तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉल करु शकता

UIDAI ने टोल फ्री नंबर देखील जारी केला आहे, त्यामुळे तुम्हाला आधारशी संबंधित काही समस्या असल्यास, तुम्ही त्यासाठी हेल्पलाइन नंबर 1947 वर कॉल करु शकता. या सेवेचा लाभ तुम्हाला 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये घेता येईल. हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू या भाषांमध्ये मदत उपलब्ध असेल. आता तुम्हाला आधार कार्डमधील (Aadhar Card) माहिती अपडेट करणे अवघड जाणार नाही.

तुम्ही मेलवरही तक्रार करु शकता

याशिवाय UIDAI ने एक मेल आयडी देखील जारी केला आहे, ज्याद्वारे तुम्ही तक्रार करु शकता. तुम्हाला तुमची समस्या help@uidai.gov.in वर मेल करुन पाठवावी लागेल. UAIDI चे अधिकारी वेळोवेळी हा मेल चेक करुन लोकांच्या समस्या सोडवतात. तक्रार कक्ष ई-मेलला उत्तर देऊन तुमच्या समस्या सोडवतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News Update: मुलाखतीदरम्यान विवस्त्र होण्याची मागणी, चिंबल येथील महिलेची सायबर पोलिसांकडे तक्रार

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत कथित पैसे वाटपाबाबतचा टिकलोंचा दावा कोर्टाने फेटाळला: कार्लुस फेरेरा

Lok Sabha Election 2024: गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस मतदानापासून राहणार वंचित?

Lok Sabha Election 2024: ''जगात आदर्श ठरलेली भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा डाव''; गोव्यातून अलका लांबा कडाडल्या

Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT