Twitter Dainik Gomantak
अर्थविश्व

Twitter Account: ...म्हणून ट्विटरने 11 लाख भारतीय ट्विटर अकाउंट केली बॅन

जर तुम्हीही अशी चुक करत असाल तर तुमचे ट्विटर अकाउंट बॅन होऊ शकते.

Puja Bonkile

Twitter Account: ट्विटर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीत चर्चेत राहते पण यावेळेस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ट्विटरने सुमारे 11 लाख भारतीयांचे अकाउंट बॅन केले आहे. मासिक अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे. हे मूल्यांकन प्रोसेस 26 एप्रिल ते 25 मे या कालावधीतील आहे. ट्विटरची ही एक कठोर पॉलिसी आहे, यामुळेच ते चर्चेतही आहे.

एलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटरने एकूण 11,32,228 भारतीय लोकांच्या अकाउंट बॅन केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही अकाऊंट्स बाल शोषण आणि दहशतवादीवृत्तीला समर्थनार्थ पोस्ट करत होते,त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

  • कोणत्या खात्यावर कारवाई होणार?

कंपनीच्या म्हणण्यानुसार, 264 अकाउंट बॅन करण्यात आली आहेत. यानंतर घृणास्पद वर्तनासाठी 84 अकाउंट बॅन करण्यात आली. याशिवाय सेंसटिव कंटेटमुळे 67 जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय बदनामीमुळे 51 अकाउंट बॅन करण्यात आली आहेत. यासोबतच ट्विटरवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी 1843 अकाउंट बॅन करण्यात आली.

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने मासिक अहवालात म्हटले आहे की एप्रिल आणि मे महिन्यात भारतातून एकूण 518 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नवीन IT नियम 2021 नुसार मोठ्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ज्यांचे 5 दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत, त्यांना मासिक अनुपालन अहवाल जारी करावा लागेल.

  • गेल्या महिन्यात 25 लाख अकाउंट बॅन

गेल्या महिन्याच्या अहवालानुसार, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने भारतात 25,51,623 अकाउंट बॅन केले. हे अहवाल 26 मार्च ते 25 एप्रिल कालावधीमधील होते.

एलॉन मस्कचे मोठे विधान

एलॉन मस्क काल ट्विट करत सांगितले की डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ब्लू टिक असणारे यूजर यांना दिवसाला सहा हजार पोस्ट वाचता येणार आहे.

तर ब्लू टिक नसणारे यूजर यांना दिवसाला 600 पोस्ट वाचता येणार आहे. तर नव्याने ज्यांनी ट्विटरवर अकाऊंट काढले आहेत अशा अनव्हेरिफाईड अकाऊंटसला दिवसाला 300 पोस्ट वाचता येणार आहे. तसेच एलॉन मस्क यांनी ही लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे

मस्क यांनी डेटा स्क्रॅपिंगमुळे हा दुसरा निर्णय घेतला आहे. आता ट्विटर पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणे बंधनकारक आहे. ट्विटर अकाउंट नसेल तर तुम्हाला ट्विटर ब्राऊज करता येणार नाही.

ट्विटरवरून डेटाची चोरी होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी हा निर्णय घेतला. एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले आहे.

त्यांनी अनेकदा सांगितलंय की, ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात.आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लाँच केले आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.

ट्विटरच्या या निर्णयामुळे अनेक मोठ्या कंपन्यांना देखील हा नियम लागू असल्याने आता सर्वांचीच चिंता वाढल्याचे दिसत आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सर्वत्र रेट लिमिट लागू करण्यात आले आहे त्यामुळे ट्विट करण्यात तसेच इतरांचे ट्विटर अकाऊंटला फॉलो करण्यात अडचणी येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT