Indian Economy: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली मोठी अपडेट, 2022-23 मध्ये बँकांच्या नफ्यात भरघोस वाढ

Public Sector Banks: सार्वजनिक क्षेत्रातील बँका चांगली कामगिरी करत आहेत, त्यांचा निव्वळ नफा 2022-23 या आर्थिक वर्षात जवळपास तीन पटीने वाढून 1.04 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Finance Minister Of India Nirmala Sitharaman
Finance Minister Of India Nirmala SitharamanDainik Gomantak
Published on
Updated on

Nirmala Sitharaman Statement: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँका चांगली कामगिरी करत आहेत, त्यांचा निव्वळ नफा 2022-23 या आर्थिक वर्षात जवळपास तीन पटीने वाढून 1.04 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कॉर्पोरेट्सना त्यांच्या बँक कर्जाची परतफेड करता येत नसल्याची समस्या (ट्विन बॅलन्स शीट क्रायसिस) संपली आहे. दुसरीकडे, आरबीआयचे म्हणणे आहे की आता अर्थव्यवस्थेला दुहेरी ताळेबंदाचा फायदा होत आहे.

स्थिर रेटिंग असूनही काही जागतिक बँका कोसळल्या. तर व्यावसायिक व्यवस्थापनामुळे भारतीय बँका चांगले काम करत आहेत.

नफा तिप्पट झाला

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, मोदी सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल दिसून आला आहे.

पंजाब आणि सिंध बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा 2022-23 मध्ये 1.04 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो 2014 च्या तुलनेत तिप्पट आहे.

Finance Minister Of India Nirmala Sitharaman
Indian Economy: मूडीजने जारी केला रिपोर्ट, मोदी सरकारचा वाढला ताण! भारताचा विकास दर...

मोदी सरकारच्या पावलांचं कौतुक

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मोदी सरकारने 2014 पासून घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, मालमत्तेवर परतावा, निव्वळ प्रॉफिट मार्जिन आणि प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो यासारख्या सर्व प्रमुख मापदंडांमध्ये सुधारणा झाली आहे.

Finance Minister Of India Nirmala Sitharaman
Indian Economy: भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती होणार, अर्थमंत्री सितारमन यांचे देशासाठी मोठे स्वप्न

अर्थमंत्र्यांनी हे निर्देश दिले

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना (Bank) नियामक मानदंडांसह मजबूत मालमत्ता दायित्व आणि जोखीम व्यवस्थापन घटकांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. याशिवाय, अर्थमंत्र्यांनी बँकांना सातत्याने डिजिटल सुरक्षेचा वापर करण्यास आणि त्यांच्या सिस्टमभोवती पुरेसे फायरवॉल सुनिश्चित करण्यास सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com