Twitter Dainik Gomantak
अर्थविश्व

Twitter Official Label: ट्विटरवर नवे 'Official' लेबल, काही वेळानंतर काढले, वाचा एका क्लिकवर काय आहे कारण

Twitter Official Label News: ट्विटरने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या सह अनेकांच्या ट्विटर अकाऊंटला ऑफिशिअल' लेबल दिलं होते.

दैनिक गोमन्तक

ट्विटरच्या नव्या फिचरने काही व्हेरिफाईड अकाऊंट्सला 'ऑफिशिअल' लेबल दिले होते. मात्र काही काळानंतर हा ऑफिशिअल लेबल काढून टाकण्यात आला. ट्विटरने (Twitter) बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, राहुल गांधी आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तींच्या व्हेरिफाईड ट्विटर हँडलवर ऑफिशिअल लेबल दिला होता. पण त्यानंतर काही काळानंतर हा ऑफिशिअल लेबल हटवण्यात आला. 

  • ब्लू टिक अन् व्हेरिफाईड अकाऊंटमधील फरक ओळखण्यासाठी नवीन फिचर

ट्विटरवर नवीन फिचर आणण्याची तयारी सुरु आहे. ट्विटर कंपनीकडून ट्विटर ब्लू टिक अकाऊंट ( Tweeter Blue Tick ) आणि व्हेरिफाईड अकाऊंट ( Verified Accounts ) यांच्यातील फरक ओळखण्यासाठी नवीन फिचर आणणार आहे. या नवीन फिचरमुळे ऑफिशिअल आणि व्हेरिफाईट अकाऊंट यांच्यातील फरक ओळखता येईल. त्यासाठी ट्विटरकडून सध्या टेस्ट सुरु आहे.

ट्विटरकडून नवीन ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरु करण्यात आले आहे. यानुसार, ट्विटर युजर्सना ब्लू टिकसाठी शुल्क भरावे लागणार आहे. ब्लू टिकसाठी ट्विटरकडून दरमहा आठ डॉलर शुल्क आकारले जाईल. त्यामुळे ट्विटर आता ब्लू टिक अकाऊंट आणि व्हेरिफाईड अकाऊंट यांच्यातील फरक ओळखण्यासाठी नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे.

  • Official Label बाबत अधिकृत माहिती नाही

ट्विटरच्या ब्लू टिक सब्सक्रिप्शननंतर कंपनी या ग्रे लेबलची चाचणी करत आहे. ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंटच्या खाली राखाडी रंगामध्ये अधिकृत ट्विटर हँडल ( Verified Twitter Account ) असा लेबल दिसत होता. हा ऑफिशिअल लेबल काही काळानंर हटवण्यात आला. अद्याप कंपनीकडून हे नवीन ऑफिशअल लेबल फिचर अधिकृतपणे लाँच करण्यात आलेले नाही. तोपर्यंत याबाबत अधिक काहीही सांगता येणार नाही. सध्या ट्विटर कंपनी किंवा नवे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी या फिचरबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. येत्या काळात याबाबत अधिक माहिती समोर येईल.

  • आधीच्या व्हेरिफाईड अकाऊंट्सना मिळणार ऑफिशिअल लेबल

मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्विटरवर ज्यांच्याकडे आधीच व्हेरिफाईड अकाउंट आहेत, त्यांनाच राखाडी रंगात 'Official Label' मिळेल. ट्विटरचे हे फिचर सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. याच चाचणी दरम्यान बुधवारी अनेक अकाऊंट्सवर हा टॅग दिसला होता, मात्र आता हा टॅग काढून टाकण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT