Toyota Innova Dainik Gomantak
अर्थविश्व

Toyota Innova HyCross: टोयोटाने केला गर्दा! लॉन्च केले इनोव्हाचे शानदार मॉडेल, टाटा-महिंद्राला देणार टक्कर

Toyota Innova HyCross Special Edition: टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारात इनोव्हा हायक्रॉसची नवीन स्पेशल एडिशन लॉन्च केली आहे. ही एक्सक्लुझिव्ह एडिशन असल्याचे सांगितले जात असून त्याची एक्स-शोरुम किंमत 32.58 लाख रुपये आहे.

Manish Jadhav

टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारात इनोव्हा हायक्रॉसची नवीन स्पेशल एडिशन लॉन्च केली आहे. ही एक्सक्लुझिव्ह एडिशन असल्याचे सांगितले जात असून त्याची एक्स-शोरुम किंमत 32.58 लाख रुपये एवढी आहे. ही शानदार कार ZX(O) व्हेरिएंटवर आधारित असून मर्यादित काळासाठी ड्युअल टोनसह सुपर व्हाइट आणि पर्ल व्हाइट या दोन कलरच्या पर्यायांमध्ये विकली जाईल. हायक्रॉस ही इनोव्हाचे हायब्रिड मॉडेल असून जास्त मायलेजसाठी लॉन्च करण्यात आले होते.

दरम्यान, ड्युअल-टोन कलर पर्यायाव्यतिरिक्त, स्पेशल एडिशनमध्ये इतर कॉस्मेटिक बदल देखील आहेत. स्पेशल एडिशन ब्लॅक-आउट एलिमेंट्स देखील दिसतील. म्हणून, फ्रंट ग्रिल, रियर गार्निश, अलॉय व्हील्स आणि हुड एम्बलम ब्लॅक कलर येतील. फ्रंट स्किड प्लेट आणि ग्रिल गार्निश आहे. साइडमध्ये व्हील आर्च मोल्डिंग्ज आहेत आणि बाहेरील रीअरव्ह्यू मिररसाठी सजावट आहे. मागील बाजूस स्किड प्लेट आणि टेलगेटसाठी गार्निश आहे. टोयोटाने या स्पेशल एडिशनमध्ये एक खास रिअर बॅज देखील जोडला आहे.

इनोव्हा हायक्रॉस किती मायलेज देते

स्पेशल एडिशन इनोव्हाच्या इंटीरियरमध्येही बदल करण्यात आले आहेत. इन्स्ट्रुमेंट पॅनल, डोअर फॅब्रिक, सीट मटेरियल आणि सेंटर कन्सोल लिड ड्युअल-टोन थीममध्ये ठेवण्यात आले आहे. टोयोटाने एअर प्युरिफायर, लेग रुम लॅम्प आणि वायरलेस चार्जर जोडले आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसमध्ये त्याच 2.0-लिटर हायब्रिड पेट्रोल (Petrol) इंजिनचा वापर करण्यत आला आहे, जो eCVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेला असतो. टोयोटाचा दावा आहे की, एमपीव्हीच्या हायब्रिड व्हर्जन प्रति लिटर 23.24 किमी मायलेज देते.

इनोव्हा हायक्रॉसचे सेफ्टी फीचर्स

इनोव्हा हायक्रॉसला अलिकडेच अकॉस्टिक व्हेईकल अलर्ट सिस्टिम (AVAS) ने अपडेट करण्यात आले आहे. हे एक सेफ्टी फीचर्स असून ज्यामध्ये जर कोणी गाडीजवळ आले तर ते ड्रायव्हरला आवाजाने अलर्ट करते. सध्या इनोव्हा हायक्रॉसची किंमत 19.94 लाखांपासून सुरु होते आणि 32.58 लाखांपर्यंत जाते. या दोन्ही किमती एक्स-शोरुम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT