Shaktikanta Das Dainik Gomantak
अर्थविश्व

Shaktikanta Das: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना टॉप सेंट्रल बँकर अ‍ॅवॉर्ड

जूनमध्येच झाला होता जगातील सर्वोत्कृष्ट गव्हर्नर म्हणून सन्मान

Akshay Nirmale

Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा मोरोक्कोने सर्वोच्च सेंट्रल बँकर हा जागतिक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. सप्टेंबरमध्ये, शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2023 मध्ये A+ रेटिंग मिळाले होते.

RBI ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शक्तीकांत दास यांचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो शेअर केला आहे

वार्षिक सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्डमधील सर्वोच्च रँक अशा गव्हर्नरांना दिले जाते ज्यांनी रणनीतीने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मौलिकता, सर्जनशीलता आणि कठोर परिश्रम या बाबतीत चांगले प्रदर्शन केले आहे.

दास यांच्याशिवाय स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर जे. जॉर्डन आणि व्हिएतनामचे गव्हर्नर गुयेन थी होआंग यांनाही A+ ग्रेड मिळाली आहे.

101 हून अधिक गव्हर्नरचा समावेश

सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड 1994 पासून ग्लोबल फायनान्सद्वारे दरवर्षी प्रकाशित केले जाते. यामध्ये, 101 देश, प्रदेश आणि जिल्ह्यांच्या मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरना श्रेणीबद्ध केले आहे.

यामध्ये बँक ऑफ युरोपियन युनियन, ईस्ट कॅरिबियन सेंट्रल बँक, बँक ऑफ सेंट्रल आफ्रिकन स्टेट्स आणि सेंट्रल बँक ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड 2023 मध्ये 'A+' रेटिंग मिळवल्याबद्दल शक्तीकांत दास यांचे अभिनंदन केले होते.

पीएम मोदींनी लिहिले होते, 'आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. शक्तीकांत दास यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाच्या विकासाच्या प्रवासाला बळकट करत राहील.

ग्लोबल फायनान्स मॅगझिनच्या एका विधानानुसार, त्यांनी दिलेले ग्रेड महागाई नियंत्रण, आर्थिक विकासाची उद्दिष्टे, चलन स्थिरता आणि व्याज दर व्यवस्थापनातील यशासाठी A ते F च्या स्केलवर आधारित आहेत. आहेत. A उत्कृष्ट कामगिरीसाठी तर F अपयशासाठी दिले जाते.

सेंट्रल बँक गव्हर्नर ज्यांनी 'ए' ग्रेड मिळवला आहे त्यात ब्राझीलचे रॉबर्टो कॅम्पोस नेटो, इस्रायलचे अमीर यारॉन, मॉरिशसचे हरवेश कुमार सीगोलम आणि न्यूझीलंडचे एड्रियन ऑर यांचा समावेश आहे.

ज्या गव्हर्नरांनी 'A-' ग्रेड मिळवला आहे त्यात कोलंबियाचे लिओनार्डो विलार, डोमिनिकन रिपब्लिकचे हेक्टर वाल्डेझ अल्बिझू, आइसलँडचे एसगेर जॉन्सन आणि इंडोनेशियाचे पेरी वार्जियो यांचा समावेश आहे.

शक्तिकांत दास यांना जूनमध्ये लंडनमध्ये सेंट्रल बँकिंग पुरस्कार 2023 मध्ये 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोविड महामारीच्या काळात घेतलेले निर्णय आणि महागाईचे कार्यक्षम व्यवस्थापन यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT