Cheapest Electric Cars : भारतात गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साहजिकच अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. भारतात सध्या टाटा मोटर्स, महिंद्रा, एमजी यासारख्या कंपन्यांकडून विविध इलेक्ट्रिक कारचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. तर महागड्या प्रीमियम कारच्या सेगमेंटमध्ये Kia, Hyundai आणि Mercedes यासारखे पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारची किंमत ICE इंजिन असणाऱ्या कारपेक्षा कैकपटीने जास्त आहे. त्यामुळेच अनेक ग्राहकांना इच्छा असूनही इलेक्ट्रिक कार खरेदी करणंं शक्य होत नाही. मात्र भारतीय बाजारपेठेत सर्वसामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कारही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील इलेक्ट्रिक कार उत्पादक PMV Electric कंपनीने भारतात नुकतीच PMV Ease ही कार लॉन्च केली आहे. ही 2 सीटर मायक्रो कार असून सध्या कंपनीने कारचं एकच व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 4.79 लाखांपासून सुरु होत असून कारमध्ये 48V लिथियम आयऑन बॅटरी देण्यात आली आहे. या कारमध्ये वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार जवळपास 120, 160 आणि 200 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.
Tata Tiago EV कंपनीचे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ही एक इलेक्ट्रिक हॅचबॅक कार असून कंपनीने प्रकारात लॉन्च केली आहे. ज्यात XE, XT, XZ और XZ Lux प्रकारांचा समावेश आहे. या कारची एक्स दिल्ली शोरुम किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरु होत असून टॉप व्हेरिएंटची किंमत 11.79 लाख रुपये आहे. या कारमध्ये 19.2kWh आणि 24 kWh क्षमतेच्या दोन बॅटरीचा पॅक देण्यात आला असून ही कार एकदा चार्ज केल्यावर 250 आणि 315 किमीपर्यंत धावू शकते.
महिंद्रा ई व्हेरिटो ही एक इलेक्ट्रिक सेडान कार आहे. या कारच्या दोन व्हेरिएंट कंपनीने बाजारात आणल्या आहेत, ज्यात D2 आणि D4 या व्हेरिएंटचा समावेश आहे. या कारमध्ये 288Ah ची लिथियम आयऑन बॅटरी देण्यात आली असून 72V ची इलेक्ट्रिक मोटरही देण्यात आली आहे. यामुळे कार एकदा पूर्ण चार्ज केल्यास 120 किमीपर्यंत चालू शकते. ही कार प्रतितास 86 किमीच्या टॉप स्पीडने धावू शकते.
MG Motor कंपनी भारतात सध्या MG ZS EV या इलेक्ट्रिक कारची विक्री करत आहे. या कारला बाजारात मोठी मागणी असली तरीही या कारची किंमत 20 लाखांहून अधिक असल्यामुळे ती खरेदी करणं अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यातच कंपनी भारतात आपली एक छोटी आणि स्वस्त कार आणण्याच्या विचारात आहे. MG Air EV India ही कार भारतात लॉन्च होणार असल्याचं बोललं जात आहे. ही कार जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होऊ शकते. या कारला दोन दरवाजे असतील. कारची किंमत 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे. कारची किंमत अजून अधिकृतपणे कंपनीने जाहीर केली नसली तरीही या कारची थेट स्पर्धा Tata Tiago EV सोबत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.