Threads App Dainik Gomantak
अर्थविश्व

मनमाणी संपणार! मेटाचे Threads App देणार ट्विटरला टक्कर; लवकरच होणार लॉंच

Twitter: सतत होणाऱ्या बदलांना यूजर्स वैतागले आहेत. त्यामुळे अनेकांनी मेटाच्या या Threads App चे स्वागत केले आहे.

Ashutosh Masgaunde

Threads App Vs Twitter: फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मालकीची मेटा ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी त्यांचे नवीन टेक्स्ट-आधारित Threads App लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. असा दावा केला जात आहे की हे सोशल मीडिया अ‍ॅप याच आठवड्यात लॉन्च केले जाऊ शकते.

एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक सुविधांसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. तसेच सतत होणाऱ्या बदलांना यूजर्स वैतागले आहेत. त्यामुळे अनेकांनी मेटाच्या या Threads App चे स्वागत केले आहे.

निर्माते आणि सर्वसामान्य यूजर्सकडून ट्विटरच्या पर्यायाची मागणी सातत्याने करण्यात येत होती. आम्हालाही अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म यूजर्ससाठी उपलब्ध करुन द्यायचा होता. त्यामुळे आम्ही थ्रेड्स अ‍ॅप लॉंच करण्याचा निर्णय घेतला.
ख्रिस कॉक्स, मेटाचे प्रॉडक्ट अधिकारी

थ्रेड्स अ‍ॅप म्हणजे काय?

थ्रेड्स, इंस्टाग्रामचे text-based conversation app, गुरुवारी, 6 जुलै रोजी रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

थ्रेड्समध्ये लॉग इन करण्यासाठी आणि त्यांच्या फॉलोवर्सला फॉलो करण्यासाठी, यूजर्स त्यांचे Instagram हँडल वापरू शकतील. थ्रेड्सचा इंटरफेसही ट्विटरसारखाच असणार आहे. ज्यात रीपोस्ट करणे, लाइक आणि कमेंट यासारखी वैशिष्ट्ये आहेत.

सध्या थ्रेड्स अ‍ॅप अ‍ॅपल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र अ‍ॅड्रॉइड यूजर्ससाठी Google Play Store वर थ्रेड्स अ‍ॅपच्या लॉन्चबद्दल कोणतीही माहिती नाही.

ट्विटरचा पर्याय

एलॉन मस्कने नवीन निर्बंध जाहीर केल्यानंतर लगेचच ब्लूस्की आणि मास्टोडॉन सारख्या ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मवर यूजर्स आणि ट्राफिकमध्ये वाढ झाली. आता थ्रेड्सचा पर्याय समोर आल्याने यूजर्स ट्विटरची मनामाणी खपवून घेणार नाहीत, यात शंका नाही.

ब्लूस्की अ‍ॅप ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी लॉन्च केले होते. तर मास्टोडॉनची निर्मिती युजेन रोचको यांनी केली आहे.

ट्विटरचा नवा आदेश

वास्तविक, ट्विटर रोज नवनवीन फर्मान जारी करत आहे. एक दिवस आधी, ट्विटरने ब्लू टिक्सशिवाय वापरकर्त्यांची पोस्ट पाहाण्याची मर्यादा निश्चित केली होती. आणि आता कंपनीने ब्लू टिक्सशिवाय वापरकर्त्यांद्वारे ट्विटडेक वापरण्यावर बंदी घातली आहे.

मस्कच्या या निर्णयांना प्रचंड विरोध होत असून, यूजर्सही ट्विटरचा पर्याय शोधत आहेत. अशा परिस्थितीत मेटाचे नवीन अ‍ॅप लाँच करणे फायदेशीर ठरू शकते.

मेटाच्या नव्या अ‍ॅप थ्रेड्स हे नाव, ट्विटरचा प्रतिस्पर्धी म्हणून चपलख आहे. मात्र, मेटाने SnapChat ला पर्याय देण्यासाठी एका अ‍ॅपला हे नाव देले होते. मात्र, ते लॉंच होऊ शकले नव्हते. आता मेटा हेच नाव ट्विटरच्या प्रतिस्पर्धी अ‍ॅपला वापरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

Goa Live Updates: नीता कांदोळकर यांनी दिला सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा!

SCROLL FOR NEXT