VIP Mobile Number Dainik Gomantak
अर्थविश्व

VIP Mobile Number : तुम्हालाही फॅन्सी VIP मोबाईल नंबर हवाय? अशाप्रकारे मिळवा तुमच्या आवडीचा क्रमांक

जर तुम्हाला असा नंबर घ्यायचा असेल तर Vi ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

इंटरनेट आणि स्मार्टफोन्सच्या आगमनाने आपल्याला सुविधा तर मिळाल्याच पण आपली जीवनशैलीही खूप बदलली आहे. यामुळेच अनेकांना फॅन्सी मोबाईल नंबर खरेदी करायचे असतात. ज्याप्रकारे वाहनांना फॅन्सी क्रमांक घेण्याची आवड आहे, त्याचप्रमाणे लोकांनाही VIP मोबाईल क्रमांक घ्यावासा वाटतो. व्हीआयपी नंबरसाठी, तुम्हाला सामान्य कनेक्शनपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील.

काही वेळा त्यांचा लिलावही केला जातो, ज्यामध्ये नंबरसाठी बोली लावली जाते. विशेषत: बीएसएनएलच्या व्हीआयपी क्रमांकांबाबत असेच घडते. व्हीआयपी नंबर मोफत कसा मिळेल हा प्रश्न आहे. आम्ही अशाच एका पद्धतीची माहिती घेऊन आलो आहोत. येथून तुम्हाला व्हीआयपी क्रमांक मोफत मिळू शकतो. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

या क्रमांकांना व्हीआयपी किंवा फॅन्सी म्हटले जाते कारण ते सामान्य क्रमांकांपेक्षा वेगळे असतात आणि तुम्ही ते एका दृष्टीक्षेपात लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला असा नंबर घ्यायचा असेल तर Vi ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

VIP मोबाईल नंबर कसा मिळवायचा?

Vodafone Idea (Vi) असे नंबर ग्राहकांना देत आहे. तुम्ही प्रीपेड किंवा पोस्टपेड दोन्हीसाठी व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला नवीन कनेक्शन श्रेणी मिळेल. या विभागात तुम्हाला फॅन्सी नंबर श्रेणीवर क्लिक करावे लागेल. आता तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल जिथे तुम्हाला प्रीपेड कनेक्शन हवे आहे की पोस्टपेड हे ठरवायचे आहे. येथे तुम्हाला तुमच्या क्षेत्राचा पिन कोड आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.

आता तुम्हाला तो नंबर शोधायचा आहे जो तुम्हाला विकत घ्यायचा आहे किंवा तुम्ही Vi च्या फ्री लिस्टमधून कोणताही नंबर निवडू शकता. तुम्हाला फ्री आणि प्रीमियम नंबर यापैकी एक निवडावा लागेल. प्रीमियम नंबरसाठी तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. जर तुम्हाला तुमच्या पसंतीचा क्रमांक मिळाला तर तुम्ही प्रीमियम पर्यायासाठी जावे. अन्यथा, तुम्ही विनामूल्य श्रेणीमध्ये उपलब्ध असलेला कोणताही क्रमांक निवडू शकता. नंबर निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल. पेमेंट केल्यानंतर, कंपनी सिम तुमच्या घरी पोहोचवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT