टेक महिंद्रा (Tech Mahindra) समूहाची कंपनी कॉमविवा (Comviva) जुलै 2022 पर्यंत सुमारे 600 अभियंत्यांची भरती (Employment) करणार आहे. कंपनीच्या (Company) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, वाढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी ही भरती आवश्यक आहे. Comviva प्रामुख्याने मोबाइल डिव्हाइस आधारित अॅप्स आणि तंत्रज्ञानासाठी IT उपाय पुरवते.
Comviva चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मनोरंजन महापात्रा म्हणाले की, "आता कंपनीचे लक्ष दुसऱ्या श्रेणीतील शहरांवर आहे आणि याच क्रमाने भुवनेश्वर केंद्राचा विस्तार केला जात आहे. कंपनीच्या नव्या रणनीतीनुसार तीन वर्षांपूर्वी हे केंद्र सुरू करण्यात आला आहे."
600 जणांची भरती करणार
महापात्रा म्हणाले, "आमच्या टीममध्ये सुमारे दोन हजार सदस्य आहेत. आम्ही दरवर्षी सुमारे 600 लोकांची भरती करू. यापैकी सुमारे 300 थेट विद्यापीठांमधून भरती होतील तर उर्वरित 200 किंवा 300 अनुभवी असतील. कंपनीतील नोकऱ्या गमावण्याचे प्रमाण मागील काही तिमाहींमध्ये 15-16 टक्क्यांवरून 20-23 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. कंपनीने जुलै 2022 पर्यंत सुमारे 600 लोकांची भरती करण्याची योजना आखली आहे आणि त्यानंतर भुवनेश्वर केंद्रात मनुष्यबळ वाढवण्यासाठी भरती सुरू राहील. भुवनेश्वरमध्ये आता आम्ही 20 पेक्षा कमी लोक आहोत पण यावर्षी योजनांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. आम्ही भरती सुरू केली आहे आणि ती 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. चालू आर्थिक वर्षात जवळपास 60-70 लोक असतील, पण दोन वर्षांत केंद्रात 200-300 लोक असतील. आता कंपनीची प्रतिभा संपादन करणे किती सोपे आहे यावर पुढील नियोजन अवलंबून असेल."
चालू आर्थिक वर्षात महसुलात 12 टक्क्यांनी वाढ अपेक्षित
महसूल वाढीबाबत ते म्हणाले की, कंपनीला चालू आर्थिक वर्षात 10-12 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात Comviva चा महसूल 845.1 कोटी होता. आम्ही आमची सर्व मोबाइल पेमेंट, सुपर अॅप्स, व्यापारी अॅप्स, ग्राहक अॅप्स, सेल्फ-केअर अॅप्ससह जे काही करू ते पुढील 18-24 महिन्यांत करू. भुवनेश्वर हे मोबाईल ऍप्लिकेशन्ससाठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून ओळखले जाईल. कंपनीच्या पुढील पिढीचा क्रियाकलाप मोबाइल उपकरणांभोवती असेल, ज्यामध्ये वेअरेबलसाठी सॉफ्टवेअर लिखाणाचा समावेश असेल.
स्मार्ट वॉच
तुम्ही तुमच्या घड्याळातून व्यापाऱ्यांना पेमेंट करू शकता किंवा तुमच्या कुटुंबाला पैसे ट्रान्सफर करू शकता. तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा फोनवर जाण्याची गरज नाही. हे एक असे क्षेत्र आहे जे आम्ही भुवनेश्वरसाठी निवडले आहे आणि दुसरे क्षेत्र - मोबाईल मनी, डिजिटल बँकिंग-साटी असणार आहे. कंपनीच्या यो प्रोजेक्टमधून मोठ्या अपेक्षा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.