143 वस्तूंपैकी 92 टक्के स्लॅब 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 आणि डिसेंबर 2018 मध्ये जीएसटी कौन्सिलने अशा अनेक वस्तुंच्या किमती कमी केल्या होत्या. अनेक राज्यांनी सध्या वाढत्या महागाईमुळे दर बदलण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (these 143 items 92 per cent are proposed to be shifted from 18 per cent tax slab to top 28 per cent slab)
महसूल वाढवण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) नुसार जीएसटी परिषदेने 143 वस्तूंच्या दरात वाढ करण्याबाबत राज्यांची मते मागवली असल्याचे म्हटले जात आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार, या वस्तूंमध्ये पापड, गूळ, पॉवर बँक, घड्याळे, सुटकेस, हँडबॅग, परफ्यूम/डिओडोरंट, रंगीत टीव्ही सेट, चॉकलेट्स, च्युइंगम, अक्रोड, कस्टर्ड पावडर, नॉन-अल्कोहोल यांचा समावेश आहे. शीतपेये, सिरॅमिक सिंक, वॉश बेसिन, गॉगल्स, चष्म्यांच्या फ्रेम्स, चामड्याचे कपड्यांच्या किमती वाढत आहेत.
या 143 वस्तूंपैकी 98 टक्के वस्तूंचा जीएसटी दर 18 टक्के कर होता जो आता 28 टक्के करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. अशा अनेक वस्तू आहेत, ज्यांच्या किमती GST परिषदेने नोव्हेंबर 2017 आणि डिसेंबर 2018 मध्ये कमी केल्या होत्या आणि आता या GST वाढीमुळे या वस्तूंचे दर पुन्हा गगणाला भिडणार आहेत.
जीएसटीच्या दरांमध्ये हा बदल अनेक टप्प्यांत होऊ शकतो कारण सध्या अनेक राज्यांनी दर वाढवण्याचा निर्णय घेतला. महागाईमुळे दर बदलण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मार्च 2022 मध्ये WPI महागाई 14.55 टक्क्यांवर पोहोचली आहे, तर किरकोळ महागाई मार्चमध्ये 17 महिन्यांच्या उच्चांकी 6.95 टक्क्यांवर पोहोचली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.