Telegram Dainik Gomantak
अर्थविश्व

Telegram New Feature: ऑफिस मिटिंग, सेमिनार्ससाठी टेलिग्राम बेस्ट, आता एकाच वेळी 200 लोकांना व्हिडिओ कॉलवर बोलता येणार!

Telegram New Feature 2025: तुम्ही टेलिग्राम यूजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. टेलिग्रामने आपल्या यूजर्संसाठी एक शानदार फीचर लॉन्च केले आहे. हे अ‍ॅप आता केवळ मेसेजिंगसाठीच नाहीतर व्हिडिओ कॉलसाठीही यूजर्सची पहिली पसंती बनेल.

Manish Jadhav

तुम्ही टेलिग्राम यूजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. टेलिग्रामने आपल्या यूजर्संसाठी एक शानदार फीचर लॉन्च केले आहे. हे अ‍ॅप आता केवळ मेसेजिंगसाठीच नाहीतर व्हिडिओ कॉलसाठीही यूजर्सची पहिली पसंती बनेल. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही टेलिग्रामवर एका वेळी 200 लोकांना व्हिडिओ कॉल करु शकता. तुम्ही त्यावर त्यांच्याशी तासन्तास बोलू शकता. हे फीचर पूर्णपणे मोफत आणि सुरक्षित असणार आहे. हे अ‍ॅप एन्क्रिप्टेड ग्रुप व्हिडिओ कॉल ऑफर करते. टेलिग्रामचे हे अ‍ॅप थेट गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सला टक्कर देऊ शकते. गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट दोन्ही प्लॅटफॉर्मवर इतक्या लोकांना व्हिडिओ कॉल करता येत नाही.

नवीन फीचरमध्ये काय खास आहे?

टेलिग्रामने (Telegram) 2021 मध्ये ग्रुप कॉलिंग फीचर सुरु केले होते. पण आता प्लॅटफॉर्मने त्यात एक नवीन अपडेट आणले आहे. या नव्या अपडेटमध्ये तुमचे संभाषण पूर्णपणे सुरक्षित असेल. तुमचे बोलणे इतर कोणीही ऐकू शकणार नाही. या व्हिडिओ कॉल सेवेचे अनेक फायदे आहेत. खास गोष्ट म्हणजे कॉल करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ग्रुप तयार करण्याची गरज नाही. तुम्ही थेट कॉल सुरु करु शकता. कॉलमध्ये इतरांना जोडण्यासाठी तुम्ही लिंक किंवा QR कोड पाठवू शकता. कॉलदरम्यान तुम्ही ऑडिओ, व्हिडिओ किंवा स्क्रीन देखील शेअर करु शकता.

कॉल करताना सुरक्षितता?

टेलिग्रामवर कॉल करताना काही धोका आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता. हे तपासण्यासाठी जेव्हा तुम्ही कॉलवर असता तेव्हा स्क्रीनवर चार इमोजी दिसतील. कॉलवर जो कोणी असेल तो तो एकत्र पाहू शकतो. जर हे इमोजी जुळत असतील तर तुमचा कॉल 100 टक्के सुरक्षित आहे.

टेलिग्रामच्या मते, हे अ‍ॅप सुरुक्षित आहे. गेल्या 10 वर्षात कोणीही ते हॅक करु शकलेले नाही. कंपनी हॅकरला $100,000 (सुमारे 84 लाख रुपये) चे बक्षीस देखील देत आहे.

एवढेच नाही तर टेलिग्रामने त्यांच्या प्रीमियम बिझनेस अकाउंट्ससाठी नवीन एआय (AI) टूल्स देखील लॉन्च केले आहेत. ज्याचा वापर करुन वापरकर्त्यांना आणखी चांगला अनुभव मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Naik Murder Case: सुभाष नाईक यांचा खूनच! पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या, प्रकरणाला नाट्यमय वळण; बारमधील सीसीटीव्हीचा ‘डीव्हीआर’ही जप्त

Goa Island Management Plan: द्वीप व्यवस्थापनात होणार ‘त्या’ बेटांचा समावेश! राज्य सरकारने ठोकले पाय; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला पाठवणार पत्र

राज्यात वाघांचं अस्तित्व संपवण्याचा कट? साकोर्डा परिसर शिकाऱ्यांचं नंदनवन; कुजलेल्या अवस्थेत 'पट्टेरी वाघ' सापडल्यानं खळबळ

Horoscope 3 May 2026: सुवर्णयोग घेऊन आला 'रविवार'! आजचा दिवस तुमच्या राशीसाठी खास; ग्रहांची मिळणार उत्तम साथ

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'दक्ष'ची गरुडझेप! परिस्थितीशी झुंज देत गाठलं यश, आता ध्येय 'सीए' होण्याचं, पण आर्थिक मदतीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT