Job In India Dainik Gomantak
अर्थविश्व

Job In India: बंपर नोकर भरती! लोकसभा निवडणुकीपूर्वी 'ही' कंपनी देणार 1.5 लाख नोकऱ्या

Job In TCS: कंपनीने अलीकडे नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. वास्तविक, या कंपनीचे नाव टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस आहे.

दैनिक गोमन्तक

Job in TCS: येत्या काळात देशातील लोकांसाठी नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि पुढील आर्थिक वर्षात एक कंपनी लाखो लोकांना नोकऱ्या देणार आहे. कंपनीने अलीकडे नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. वास्तविक, या कंपनीचे नाव टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस आहे. TCS ने पुढील आर्थिक वर्षात लाखो लोकांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे.

टीसीएस

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार TCS ने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होईल असे म्हटले आहे. यासोबतच 2023-24 या आर्थिक वर्षात 1.25 लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या देणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची (Employees) संख्या 2,197 ने कमी झाली आणि आता ती 6.13 लाख झाली आहे.

tcs नोकरी

कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले की, आगामी काळात आम्ही जवळपास समान स्तरावर भरती करत आहोत. पुढील आर्थिक वर्षात 1,25,000 ते 1,50,000 लोकांची भरती होणार आहे.

माहितीनुसार, TCS ने 2021-22 या आर्थिक वर्षात 1.03 लाख नवीन लोकांना नोकऱ्या दिल्या. दुसरीकडे, कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कर यांनी सांगितले की, 2022-23 मध्ये आतापर्यंत 42,000 नवीन लोकांची भरती करण्यात आली आहे.

TCS शेअर

दुसरीकडे, टीसीएसचे तिमाही निकाल गुंतवणूकदारांच्या (Investors) अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात शेअरमध्येही घसरण झाली. डिसेंबर तिमाहीच्या निकालांमध्ये, TCS चा निव्वळ नफा 11 टक्क्यांनी वाढून 10,846 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तथापि, नफ्याचे मार्जिन आणि सौद्यांची संख्या कमी झाल्यामुळे काही नरमाई दिसून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

Davorlim: फ्लॅटमध्ये राहायचे 20 जण, चालायचा बेकायदेशीर मदरसा; रुमडामळ-दवर्लीत 17 अल्‍पवयीन मुलांची सुटका

Goa Opinion: गोव्यात मूलभूत सोयीसुविधा ज्या दिवशी निष्पक्षपणे मिळतील, तेव्हा ‘रामराज्य’ आले असे म्हणता येईल

Goa Live News: गोवा टॅक्सी संघटनांनी जुंता हाऊस येथे केला मूक निषेध

Police Attacks Goa: सामान्यांसाठी पोलिसी खाक्या, माफियांसमोर हुजरेगिरी; बेतूल, वास्कोत 'सिंघम'वर झालेले हल्ले

SCROLL FOR NEXT