TAX Collection: Central government's target of Rs 22.2 lakh crore collection
TAX Collection: Central government's target of Rs 22.2 lakh crore collection  Dainik Gomantak
अर्थविश्व

TAX Collection: केंद्र सरकारचे यंदा 22.2 लाख कोटींचे लक्ष

Abhijeet Pote

केंद्र सरकार(Central Government) चालू आर्थिक वर्षाच्या(Financial Year) उद्दिष्टापेक्षा जास्त कर वसूल(Tax) (Tax Collection) करू शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे, म्हणजेच यंदा एप्रिल ते पुढच्या वर्षी मार्चपर्यंत केंद्र सरकारचे कर संकलन वाढणार आहे. कारण पहिल्या तिमाहीत सरकारने 5.6 लाख कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. वर्षभरात सरकारचे लक्ष्य 22.2 लाख कोटी रुपये इतका कार गोळा करणे हे आहे.(GST)

रेटिंग एजन्सी इक्राने एका अहवालात अशी आशा व्यक्त केली आहे की, या काळात अप्रत्यक्ष कर जास्त राहील. यावर्षी कर संकलनात सरकारने 9.5% वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. 2021 आर्थिक वर्षात सरकारने 20.2 लाख कोटी रुपयांचा कर वसूल केला होता. तथापि, दुसरी लाट असूनही सरकारने एप्रिल ते जून या तिमाहीत चांगला कर संग्रह केला आहे.त्यामुळेच ही शक्यता वर्तवली जात आहे.

एप्रिल ते जून या तिमाहीत 5.6 लाख कोटी रुपयांचा कर संग्रह 2019-20 च्या जून तिमाहीपेक्षा 39% जास्त आहे. हे कोरोनाच्या आधीचे वर्ष आहे. म्हणजेच कर संकलन कोरोनाच्या आधीच्या पातळीपेक्षा अधिक झाले आहे. महसूल विभागाने अद्याप डेटा संग्रहण अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. वित्त मंत्रालयाने 1 July जुलै रोजी लोकसभेत सांगितले होते की पहिल्या तिमाहीत 6.6 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते.

पहिल्या तिमाहीत पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्कातून सुमारे 94181 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.आयसीआरएच्या प्रमुख अदिती नायर म्हणाल्या की, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत आम्ही चालू आर्थिक वर्षात एकूण कर महसुलाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक मिळण्याची अपेक्षा करतो. अप्रत्यक्ष कर हे जास्त कराचे मुख्य कारण असेल. हे प्रामुख्याने पेट्रोलियम उत्पादनांमध्ये आढळते.

तसेच आयसीआरएच्या प्रमुख अदिती नायर यांच्या मते मागील वर्षीच्या जून तिमाहीत म्हणजेच 2020-21 मध्ये कर वसुली 2.7 लाख कोटी रुपये होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तो प्रारंभिक टप्पा होता. मग संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. त्या तुलनेत एप्रिल ते जून या काळात कर संग्रह 107% अधिक झाला आहे. तथापि, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते कोरोनाच्या मागील वर्षाच्या तुलनेत 39% जास्त आहे.

त्याशिवाय पहिल्या तिमाहीत जीएसटी भरपाई उपकर देखील 24,600 कोटी रुपये झाला आहे. अंदाजपत्रकाच्या अंदाजापेक्षा ते 25% झाले आहे. अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा संपूर्ण वर्षाचे संग्रह 1 लाख कोटी रुपये जास्त असू शकते. या आकड्यांच्या आधारे, आयसीआरएचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2021-22 मधील अर्थसंकल्पीय अंदाज संकलन फारच सहजपणे ओलांडले जाऊ शकते. पुढील तीन तिमाहीत संग्रहात 5% घट झाली तरीही, ती पूर्ण केली जाईल.अशी अशाही व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT