Tata Group: देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा टाटा समूह लवकरच मोबाईल फोन बनवण्याच्या व्यवसायात उतरणार आहे. टाटा समूह लवकरच आयफोनचे उत्पादन सुरु करु शकते. कंपनी Apple सप्लायर विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा करत आहे.
लवकरच दोघांमध्ये करार होऊ शकतो. हा करार निश्चित झाल्यास टाटा समूह आयफोनची निर्मिती करणारी देशातील पहिली कंपनी बनेल. आयफोन निर्माता विस्ट्रॉनचा प्लांट कर्नाटकात आहे. करार झाल्यानंतर टाटा कर्नाटकातील प्लांट ताब्यात घेऊ शकतात. टाटांचे हे पाऊल चीनला कडवी झुंज देणार आहे.
तैवानची (Taiwan) विस्ट्रॉन कंपनी करारावर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवते. अलीकडेच, कंपनीने कर्नाटक प्लांटमधून यावर्षी $1.8 अब्ज किमतीचे आयफोन बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारी प्रोत्साहन मिळावे म्हणून कंपनीला हे करायचे आहे. त्याचवेळी, कंपनी पुढील वर्षापर्यंत तिप्पट कर्मचारी वाढवण्यावरही भर देत आहे.
दुसरीकडे, विस्ट्रॉनला भारतातील (India) आयफोन उत्पादनातून बाहेर पडायचे आहे. त्यानंतर आता टाटाने ही कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला आहे. मात्र, टाटा, विस्ट्रॉन आणि अॅपलने याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा आणि विस्ट्रॉन यांच्यात चर्चा सुरु आहे. ते ऑगस्टमध्ये डील फायनल करु शकतात. टाटाचा हा करार झाला तर टाटा भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनेल. यासोबतच मेड इन इंडिया iPhones लवकरच बाजारात दिसणार आहेत.
सरकार विदेशी कंपन्यांना त्यांचे उत्पादन आणि वर्क फोर्स वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कोरोना काळापासून पुरवठा समस्या आणि अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव यामुळे परदेशी कंपन्या चीनवर अधिक अवलंबून आहेत.
अशा परिस्थितीत विदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. टाटा समूहाने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक उत्पादनात प्रवेश केला आहे. कंपनीच्या तामिळनाडूतील कारखान्यात आयफोनची चेसि म्हणजेच उपकरणाचा मेटल बॅकबोन बनवला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.