Tata Tiago NRG 2025 Launch Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Tiago NRG: टाटाने पुन्हा केला धमाका! लॉन्च केली सीएनजी हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

Tata Tiago NRG 2025 Launch: टाटाने त्यांच्या सर्वात लहान हॅचबॅक कार टियागोचे मजबूत क्रॉसओवर मॉडेल 'टाटा टियागो एनआरजी'चे लेटेस्ट व्हर्जन लॉन्च केले आहे.

Manish Jadhav

Tata Tiago NRG 2025 Launch Price Features Specs

टाटाने त्यांच्या सर्वात लहान हॅचबॅक कार टियागोचे मजबूत क्रॉसओवर मॉडेल 'टाटा टियागो एनआरजी'चे लेटेस्ट व्हर्जन लॉन्च केले आहे. नवीन कारमध्ये नवीन फिचर्स, स्टाइलिंग अपडेट्स आणि नवीन ट्रान्समिशन ऑप्शन देखील देण्यात आले आहेत.

2025 टाटा टियागो एनआरजीची किंमत आता ₹7.2 लाख ते ₹8.75 लाख एक्स-शोरुम आहे. हे मॉडेल फक्त टियागोच्या टॉप-स्पेक XZ ट्रिममध्ये उपलब्ध आहे. एंट्री-लेव्हल XT ट्रिम बंद करण्यात आली आहे. 2025 टियागो प्रमाणेच, नवीन टियागो एनआरजीमध्ये मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, तर मोठा बदल म्हणजे सीएनजी-एएमटीचा ऑप्शन देण्यात आला आहे.

स्टायलिश अपडेट्स

2025 टाटा टियागो एनआरजीमध्ये काही किरकोळ स्टायलिश अपडेट्स आहेत. यामध्ये नवीन मॅट ब्लॅक क्लॅडिंगसह नवीन डिझाइन केलेला बंपर आणि पुढील आणि मागील बाजूस सिल्व्हर स्किड प्लेट्सचा समावेश आहे. याशिवाय, 15-इंच स्टील व्हिल्स वेगवेगळे कव्हर मिळतात. टियागो एनआरजी हे अधिक मजबूत दिसणारे मॉडेल असून त्याच्या बाजूंना ब्लॅक क्लॅडिंग आहे.

फिचर्स

केबिनमध्ये इतरही मोठे बदल आहेत, ज्यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 10.25-इंचाचा मोठा इन्फोटेनमेंट युनिट समाविष्ट आहे. हे या सेगमेंटमधील सर्वात मोठे युनिट आहे. इतर फिचर्समध्ये रिव्हर्स कॅमेरा, ऑटो हेडलॅम्प आणि वायपर आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल यांचा समावेश आहे. स्टँडर्ड टियागोच्या तुलनेत, टियागो एनआरजीमध्ये सीट्स, डोअर पॅड आणि डॅशबोर्डसह पूर्णपणे ब्लॅक रंगाचे केबिन आहे. इल्यूमिनेटेड टाटा लोगोसह एक नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील आहे.

कारमध्ये सीएनजीचा ऑप्शन उपलब्ध असणार

टाटा टियागो एनआरजीमध्ये 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 84.8 बीएचपी पॉवर देते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिटसह जोडलेले आहे. सीएनजी (CNG) व्हर्जन 71 बीएचपी पॉवर निर्माण करण्यासाठी ट्यून केलेले आहे. तसेच, ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिटशी जोडलेली आहे. या मॉडेलसाठी CNG-AMT हा एक पूर्णपणे नवीन ऑप्शन असून गेल्या वर्षी Tiago CNG मध्ये सादर करण्यात आला होता. अपडेटेड टाटा टियागो एनआरजी मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई ग्रँड आय10 निओस आणि अशाच प्रकारच्या अनेक कारशी स्पर्धा करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT