Manish Jadhav
तुम्ही कारप्रेमी असाल तर टाटाच्या या कारबद्दल तुम्हाला माहिती असेलच...
टाटाच्या या कारने विक्रीमध्ये एका नवा रेकॉर्ड केला आहे. फक्त 4.99 लाखांच्या कारच्या 6 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.
आपण येथे टाटा टिएगो बद्दल बोलत आहोत. कंपनीने एप्रिल 2016 मध्ये पहिल्यांदा कारला घरगुती मार्केटमध्ये लाँच केली होती.
Tata Tiago आपल्या मिड-साइट हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती वॅगनआर आणि स्विफ्टनंतर तिसरी सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे.
एकूण 6 व्हेरियंटमध्ये असणाऱ्या या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 86 PS ची पॉवर आणि 113 Nm चा टॉर्क जनरेट करतं.