Tata Still announce bumper bonus to the employee  Dainik Gomantak
अर्थविश्व

टाटा कंपनीचे कर्मचाऱ्यांसाठी बंपर बोनस

दैनिक गोमन्तक

देशातील प्रमुख आणि आघाडीची स्टील कंपनी टाटा स्टीलने (Tata Still) 2020-21 मध्ये आपल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना एकूण 270.28 कोटी रुपयांचा वार्षिक बोनस (Bonus) जाहीर केला असून कंपनीने एका प्रसिद्धीद्वारे ही माहिती दिली आहे.कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले आहे की "2020-2021 या वर्षाचे वार्षिक बोनस भरण्यासाठी टाटा स्टील आणि टाटा वर्कर्स युनियन यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानंतर, कंपनीचे सर्व विभाग आणि युनिट्सच्या पात्र कर्मचाऱ्यांना एकूण 270.28 कोटी रुपयांचा बोनस दिला जाईल, त्यापैकी 158.31 कोटी रुपयांची बोनस रक्कम जमशेदपूरच्या विविध विभागांना दिली जाईल. ज्यामध्ये 34,920 रुपये पासून 3,59,029 रुपये इतका बोनस कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. (Tata Still announce bumper bonus to the employee)

या करारावर कंपनीच्या वतीने, सीईओ आणि एमडी टीव्ही नरेंद्रन, एचआरएम उपाध्यक्ष अत्रेय सन्याल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली असून कामगार संघटनेच्या वतीने, टाटा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष संजीवकुमार चौधरी, टाटा वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष शैलेश कुमार सिंह कामगार संघटनेचे सरचिटणीस सतीशकुमार सिंह आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याशिवाय, स्टील कंपनी आणि इंडियन नॅशनल मेटल वर्कर्स फेडरेशन आणि राष्ट्रीय कोलियरी मजदूर संघ यांच्यातही एक सामंजस्य करारही करण्यात आला आहे. ज्यात कोळसा, खाणी आणि एफएएमडीच्या कर्मचाऱ्यांना एकूण 78.04 कोटी रुपयांचा वार्षिक बोनस दिला जाणार आहे.

बुधवारी टाटा स्टील आणि टिस्को मजदूर युनियन यांच्यात आणखी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार कंपनीने ग्रोथ शॉपसाठी वार्षिक बोनसचे एकूण पेमेंट सुमारे 3.24 कोटी रुपये ठेवले आहे .या कररावर TQM आणि E&P उपाध्यक्ष अवनीश गुप्ता, मानव संसाधन व्यवस्थापन उपाध्यक्ष अत्रेय सन्याल आणि व्यवस्थापनाच्या वतीने इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT