Tata Punch Accomplished Plus AMT Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Punch Accomplished Plus AMT: गाडी खरेदी करणार आहात? टाटा पंच घ्या फक्त 6 लाखांत, अशी करावी लागेल बुकिंग

Tata Punch: भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत एसयूव्हींची मागणी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. टाटा मोटर्सची टाटा पंच ही या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी एसयूव्ही मानली जाते.

Sameer Amunekar

भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत एसयूव्हींची मागणी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. टाटा मोटर्सची टाटा पंच ही या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी एसयूव्ही मानली जाते. दमदार डिझाईन, मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि बजेट-फ्रेंडली किंमत यामुळे ती फॅमिली कार मालकांसाठी आकर्षक पर्याय ठरली आहे. विशेष बाब म्हणजे सुमारे १० लाख रुपयांची ही कार सेकंड हँड मार्केटमध्ये फक्त ६ लाख रुपयांना उपलब्ध होत आहे.

दिल्लीतील ऑन-रोड किंमत

टाटा पंच अकम्प्लिश्ड प्लस एएमटी व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ९.०२ लाख रुपये आहे. तर दिल्लीमध्ये या गाडीची ऑन-रोड किंमत १०.१२ लाख रुपये इतकी होते. यात नोंदणी शुल्क (७० हजार रुपये) आणि विमा (सुमारे ३९,५५६ रुपये) यांचा समावेश आहे.

सेकंड हँड ऑफर

जर तुम्हाला सेकंड हँड कार खरेदी करण्याची इच्छा असेल, तर स्पिनी आणि CARS24 सारख्या प्लॅटफॉर्मवर ही कार खूप कमी दरात मिळते.

  • स्पिनीवर २०२२ मॉडेल टाटा पंच एएमटी फक्त ६.१८ लाख रुपयांना उपलब्ध आहे.

  • CARS24 वर हीच कार फक्त ६.१३ लाख रुपयांना विक्रीसाठी आहे.
    म्हणजे जवळपास १० लाखांची नवी कार, सेकंड हँड मार्केटमध्ये तब्बल ४ लाखांनी कमी दरात मिळू शकते.

इंजिन आणि परफॉर्मन्स

टाटा पंच अ‍ॅकम्प्लिश्ड प्लस एएमटीमध्ये ११९९ सीसी पेट्रोल इंजिन असून ते जास्तीत जास्त ८७ बीएचपी पॉवर आणि ११५ एनएम टॉर्क निर्माण करते. हे मॉडेल ५-स्पीड ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) आणि फ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD) तंत्रज्ञानासह येते.

वैशिष्ट्ये

  • १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

  • ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल

  • क्रूझ कंट्रोल

  • इलेक्ट्रिक सनरूफ

  • पुश-बटण स्टार्ट/स्टॉप

  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

  • स्पीड-सेन्सिंग डोअर लॉक

  • एलईडी डीआरएल, रूफ रेल्स आणि इमर्जन्सी कॉल बटण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मला श्रीमंत केले; गोव्यातील प्रसिद्ध मच्छीमार 'पेले'ने सांगितला अनुभव

Goa News: मुसळधार पाऊस, अपघात; गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

ब्रेकअप के बाद... हृदय तुटल्यानंतर Google मधील अडीच कोटी पगाराच्या नोकरीवर मारली लाथ; सुरु केला स्वत:चा व्यवसाय

Asia Cup 2025 Schedule: आशिया कप स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल, किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या

बायकोच्या अफेअरबाबत पतीला कळालं, डंबलने ठेचून तिने नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT