Tata Motors Price Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Motors Price Hike: मारुतीनंतर आता टाटाची वाहनेही महागणार! 1 एप्रिलपासून किमतीत होणार वाढ; जाणून घ्या

Tata Motors April 2025 Price Increase: एप्रिल महिन्यात टाटाचे वाहन खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Tata Motors To Increase Vehicle Prices From 1 April 2025

एप्रिल महिन्यात टाटाचे वाहन खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने 1 एप्रिल 2025 पासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. वाढत्या खर्चामुळे हे पाऊल उचलावे लागत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कच्च्या मालाची किमतीत वाढ

ऑटोमोबाईल्स उद्योगातील कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत, ज्यामुळे कंपनीच्या खर्चावर परिणाम होत आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) त्यांच्या कमर्शियल वाहनांच्या म्हणजेच ट्रकच्या किमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार बदलेल. यापूर्वी, मारुतीनेही एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली.

कमर्शियल वाहनांच्या किमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ

टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले की, 1 एप्रिल 2025 पासून त्यांच्या कमर्शियल वाहनांच्या किमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ होईल. वाढत्या इनपुट खर्चाचे संतुलन साधण्यासाठी किमतीत वाढ केली जात आहे. प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार ती बदलू शकते. वाढत्या खर्चामुळे हे पाऊल उचलणे आवश्यक झाले आहे.

मारुतीनेही किंमत वाढीचा निर्णय घेतला

यापूर्वी, भारतातील (India) सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही एप्रिल 2025 पासून त्यांच्या सर्व वाहनांच्या किमती 4 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. कंपनीने यामागे अनेक कारणे दिली. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाढता वाहतूक खर्च आणि वाढती महागाई या कारणांमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कंपनीने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढ होत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमधील चढ-उतार

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्येही चढ-उतार होत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ सर्व मॉडेल्संना लागू असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, ते ग्राहकांवर कमीत कमी भार टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु वाढत्या खर्चामुळे किमती वाढवणे निकडीचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT