Tata New Car Models 2025: Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Upcoming Car: कारप्रेमींसाठी पर्वणी! टाटा भारतीय मार्केटमध्ये करणार मोठा धमाका; येत्या 5 वर्षांत लॉन्च करणार 30 दमदार मॉडेल्स

Tata New Car Models 2025: टाटा मोटर्सने त्यांच्या इन्वेस्टर डे 2025 च्या निमित्ताने एक महत्त्वाची घोषणा केली. कंपनीने त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले की, ते 2030 पर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहेत.

Manish Jadhav

टाटा मोटर्सने त्यांच्या इन्वेस्टर डे 2025 च्या निमित्ताने एक महत्त्वाची घोषणा केली. कंपनीने त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले की, ते 2030 पर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहेत. यासोबतच, टाटा मोटर्सने येत्या 5 वर्षांत 30 नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याची घोषणा केली. यापैकी 7 पूर्णपणे नवीन मॉडेल्स असतील, तर उर्वरित 23 विद्यमान कारच्या फेसलिफ्ट आणि अपडेटेड व्हर्जन म्हणून लॉन्च केले जातील.

अविन्या आणि सिएरा एसयूव्ही

दरम्यान, येत्या काळात अधिक अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज मॉडेल लॉन्च करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. सिएरा एसयूव्ही या वर्षीच बाजारात येण्याची शक्यता असून अविन्याचे मॉडेल देखील येत्या काळात लॉन्च केले जाऊ शकते. टाटा मोटर्सची ही रणनीती भविष्यातील ऑटोमोबाईल ट्रेंडनुसार इलेक्ट्रिक आणि स्मार्ट मोबिलिटी लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे.

टाटा मोटर्सचे लक्ष्य

टाटा मोटर्सचे लक्ष्य लोकांना त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करु शकतील अशा 15 हून अधिक कार मॉडेल्ससह विविध कॅटेगरीमध्ये विविधता प्रदान करणे आहे. कंपनीच्या आगामी कॅटेगरीमध्ये पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी (CNG) पर्याय तसेच इलेक्ट्रिक कार असतील. सध्या, टाटाच्या अनेक लोकप्रिय कार जसे की नेक्सॉन, पंच, टियागो, टिगोर, कर्व्ह आणि हॅरियर आहेत. तसेच, इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही अनेक मॉडेल प्रसिद्ध आहेत.

टाटा हॅरियर ईव्ही

नुकत्याच सादर करण्यात आलेली टाटा हॅरियर ईव्ही तिच्या परफॉर्मन्स, फीचर्स आणि तंत्रज्ञानासह मिड-रेंजच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात एक नवीन बेंचमार्क स्थापित करत आहे. ती ग्राहकांना केवळ प्रीमियम अनुभव देत नाहीतर तिच्या स्पर्धकांशी स्पर्धा करण्याच्या स्थितीत देखील आहे. टाटा मोटर्सची ही रणनीती ग्राहकांच्या पर्यायांचा विस्तार करुन ईव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

5 वर्षांत 30 नवीन मॉडेल्स लॉन्च होणार

माध्यमांच्या वृत्तानुसार, टाटा मोटर्सने (Tata Motors) आर्थिक वर्ष 2026 ते आर्थिक वर्ष 2030 दरम्यान भारतीय बाजारपेठेत नवीन उत्पादने आणि उत्तम तंत्रज्ञानाच्या विकासासाठी 33,000 कोटी ते 35,000 कोटी रुपये गुंतवण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, कंपनी इलेक्ट्रिक वाहन (EV) सेगमेंटमध्ये सध्याच्या गुंतवणुकीच्या जवळपास दुप्पट गुंतवणूक करेल. या योजनेमागील टाटा मोटर्सचे लक्ष्य आर्थिक वर्ष 2027 पर्यंत त्यांच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिक कारचा वाटा 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आहे. भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा जलद अवलंब करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जनचा समावेश असणार

टाटा मोटर्सच्या आगामी लॉन्च होणाऱ्या मॉडेलमध्ये अनेक अफलातून फीचर्स पाहायला मिळतील. एकीकडे, कंपनी पेट्रोल आणि डिझेल व्हर्जन तसेच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सर्वात आलिशान सिएरा आणण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे, अविना ब्रँड अंतर्गत दोन नवीन मॉडेल्स लॉन्च केले जाऊ शकतात. या दोन्ही कार टाटा मोटर्सची प्रीमियम सेगमेंटमध्ये उपस्थिती आणखी मजबूत करु शकतात. गेल्या काही वर्षांत, टाटाच्या अविना कारला खूप पसंती मिळाली आहे.

कंपनी येत्या काळात विक्रीनंतरची सेवा सुधारण्यासाठी लहान शहरे आणि ग्रामीण भागात आपले नेटवर्क विस्तारण्याच्या योजनेवरही काम करत आहे. तसेच, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांना लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष लक्ष देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT