Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांचा कल हळूहळू वाढत आहे. लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे जनतेच्या खिशालाही मोठा फटका बसला आहे.
दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा खर्च वाचतो, ज्यामुळे लोकांना ते खूप किफायतशीर वाटते. दरम्यान, टाटा मोटर्स आणि आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) हातमिळवणी केली आहे. इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांच्या अधिकृत डीलर्संना आर्थिक उपाय देण्यासाठी टाटा मोटर्सने ICICI बँकेसोबत भागीदारी केली आहे. याबाबतचे निवेदनही जारी करण्यात आले आहे.
टाटा मोटर्स आता इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठही वाढवणार आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) सोमवारी एका निवेदनात सांगितले की, या भागीदारी अंतर्गत, ICICI बँक डिझेल आणि पेट्रोल मॉडेल्ससाठी बँकेच्या कर्जाव्यतिरिक्त प्रवासी ईव्हीच्या अधिकृत डीलर्संना उर्वरित इन्व्हेंटरीसाठी वित्तपुरवठा करेल.
कंपनीने सांगितले की, या भागीदारीमुळे इलेक्ट्रिक वाहनांचे डीलर्स परतफेडीच्या लवचिक कालावधीचा लाभ घेऊ शकतील. आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक राकेश झा म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन उद्योग अतिशय वेगाने वाढत आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांमध्ये पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची मागणीही वाढत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.