Tata Motors Hike Prices Dainik Gomantak
अर्थविश्व

कार घेण्याचे स्वप्न महागणार ! टाटा मोटर्सने वाढवल्या वाहनांच्या किमती

Tata Motors Hike Prices : वाहन बनवण्याच्या खर्चात वाढ झाल्यानंतर आता टाटा मोटर्स कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

सध्या सर्व बाजूंनी महागाईचा फटका जनतेला जाणवत आहे. आधी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे लोकांना जड जात होते आणि आता त्यांचे कार घेण्याचे स्वप्नसुद्धा महाग होणार आहे. वाहन बनवण्याच्या खर्चात वाढ झाल्यानंतर आता टाटा मोटर्स कंपनीने हा निर्णय घेतला आहे. (Tata Motors Hike Prices)

Tata Motors ने आपल्या वाहनांच्या किंमती सुमारे 1.1% ने वाढवल्या आहेत. मॉडेल आणि प्रकारानुसार वाहनाच्या किमती ठरवल्या जातील. गेल्या एका महिन्यात टाटा मोटर्सने दुसऱ्यांदा आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. यापूर्वी 22 मार्च रोजी कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. ही वाढ 2-2.5% ने केली आहे. ही वाढ 1 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आली आहे. प्रवासी वाहनांच्या किमतीत 1.1% ची वाढ आजपासून म्हणजेच 23 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आली आहे. म्हणजेच आजपासून लोकांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न महाग झाले आहे.

कंपनीने खर्चात वाढ झाल्याचे केले नमूद

टाटा मोटर्सने त्यांच्या वाहनांच्या किमती वाढल्याचे कारण दिले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, अलीकडच्या काळात अॅल्युमिनियम, स्टील, इतर धातू आणि इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे कंपनीचा खर्चही वाढला आहे. अशा स्थितीत खर्च वाढल्याने कंपनीने प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या इनपुट कॉस्टचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमती वाढवल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT