क्रेडिट कार्डचा खर्च EMIमध्ये ट्रान्स्फर करण्यापूर्वी घ्या या गोष्टीची काळजी

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

क्रेडिट कार्डचा खर्च EMI मध्ये ट्रान्स्फर करण्यापूर्वी घ्या या गोष्टीची काळजी

क्रेडिट कार्डवरील (Credit Card) ईएमआय उपयुक्त आणि सोयीस्कर असू शकते, परंतु त्याचा लाभ घेण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Puja Bonkile

क्रेडिट कार्डवरील ईएमआय उपयुक्त आणि सोयीस्कर असू शकते, परंतु त्याचा लाभ घेण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्याकडे बँक बॅलन्स नसलेली एखादी वस्तू खरेदी करायची असेल तेव्हा इएमआय (EMI) उपयोगी ठरते. आपल्या सर्वांच्या स्वप्नातील सुट्टी ऑनलाईन कोर्स (Online Course) , आयफोन किंवा महागडे फोन (Phone), घरासाठी फर्निचर अशा अनेक गरज असतात. या गोष्टी खरेदी करायला कधी पैसा असतो, तर कधी नसतो. यावेळी क्रेडिट कार्ड (Credit Card) फायदेशीर ठरते. पण याचा वापर विवेकपूर्ण करावा.

नेहमी खरेदी (Shopping) ही जवळ किती पैसे आहे हे पाहूनच करायला हवी. पण अनेक वेळा खरेदी हि क्रेडिट कार्डवर केली जाते. परंतु हे लक्षात ठेवा कि जर तुम्हाला पैसे भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. तुम्ही क्रेडिट कार्डवर अधिक खर्च करत असाल तरी EMI तुम्हाला जास्त व्याजदरापासून वाचवू शकते.

या गोष्टी ठेवा लक्षात

* गरज समजून घ्यावी: इएमआयवर घेतलेल्या गोष्टी तुम्हाला उपयोगी आहेत कि नाही हे लक्षात ठेवावे.

* आपले उत्पन्न किती हे लक्षात ठेवावे: तुमच्या पगारातून इएमआय देखील कापला जाईल याची जाणीव ठेवावी. त्यामुळे इएमआय घेण्यापूर्वी तुम्ही किती इएमआय भरू शकाल ते पाहावे.

* प्रक्रिया शुल्क: इएमआय योजनांमध्ये प्रक्रिया शुल्क आकारले जाते. इएमआय घेण्यापूर्वी त्याबद्दल पूर्णपणे जाणून घ्या. याशिवाय अनेक बँक शून्य व्याजदरावर इएमआय ऑफर देतात, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.

* क्रेडिट कार्डची उपलब्धता : तुमच्या कार्डवर पुरेसे क्रेडिट असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचा इएमआय नाकारला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT