Suzuki Motors Investment in Gujrat Dainik Gomantak
अर्थविश्व

Suzuki Motors Investment: आता गुजरातमध्ये तयार होणार इलेक्ट्रिक वाहने

सुझुकी मोटर्सची 10 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक

दैनिक गोमन्तक

Suzuki Motors Investment in Gujrat: ऑटोमोबाईल रोज नवनवीन तंत्रज्ञान येत असते. गुजरातमध्येही लवकरच नवे तंत्रज्ञान येणार आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी आता गुजरातमध्ये तयार होणार आहेत. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने 19 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित भारत-जपान इकॉनॉमिक फोरममध्ये जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत गुजरात राज्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने (Suzuki Motors) रविवारी सांगितले की, ते इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीच्या स्थानिक उत्पादनासाठी 10,440 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 2025 मध्ये सुझुकी मोटर गुजरातमध्ये 3100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. शिवाय 2026 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी तयार करण्यासाठी प्लांट उभारण्यासाठी 7300 कोटींची गुंतवणूक केली जाईल.

पेट्रोल आणि डिझेल (Petrol and Diesel) हे मर्यादित इंधन स्त्रोत आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे, लोक यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे खरेदी करत आहेत. पण समस्या अशी आहे की, सीएनजी (CNG) आणि डिझेल-पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने अजूनही खूप महाग आहेत. अशा परिस्थितीत, सुझुकीच्या या गुंतवणुकीमुळे महागड्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होऊ शकतात, कारण जेव्हा इलेक्ट्रिक वाहने भारतात तयार होईल, तेव्हा बाजारपेठेतील स्पर्धाही वाढेल. पुरवठा साखळी चांगली राहील आणि वाहनांची किंमतही कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT