Finance Minister Of India Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: करदात्यांसाठी मोठी बातमी, अर्थमंत्र्यांनी 'ही' सूचना मान्य केल्यास...

Direct Tax Collection: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांची सूचना मान्य केली तर करदात्यांना ते फायदेशीर ठरेल.

Manish Jadhav

Income Tax Collection: तुम्हीही दरवर्षी इन्कम टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करु शकते. होय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांची सूचना मान्य केली तर करदात्यांना ते फायदेशीर ठरेल.

प्रसिद्ध अर्थतज्ञ सुरजित भल्ला म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश नाही, परंतु येथील करसंकलन खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत प्राप्तिकराचा दर सध्याच्या 40 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांवर आणला पाहिजे.

भारत जगातील सर्वात जागतिकीकृत अर्थव्यवस्था

आर्थिक विकासाला गती देण्यासाठी टॅक्स दर कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भल्ला म्हणाले की, 'भारत (India) जगातील सर्वात जागतिकीकृत अर्थव्यवस्था आहे.

देशातील कररचनेवर नजर टाकली तर आपण जगातील सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्था नसलो तरी कर संकलन जास्त आहे. ते पुढे म्हणाले की, राज्य, केंद्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर संकलन हे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे 19 टक्के आहे.

एकूण कर दर 25 टक्के करण्याची सूचना

सुरजित भल्ला म्हणाले की, 'आपण ते 2 टक्क्यांनी कमी करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. जोपर्यंत थेट करांचा संबंध आहे, मला वाटते की एकूण टॅक्स दर 25 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.

सध्या तो उपकरासह सुमारे 40 टक्के आहे. कॉर्पोरेट टॅक्स दर 25 टक्के आहे, हा आपला आयकर दर असावा. सध्या देशात आयकराचा कमाल दर 39 टक्के आहे.'

दुसरीकडे, समाजातील काही निवडक वर्गाला फायदा होण्याऐवजी सर्वांसाठी कर कमी करण्याची गरज आहे, असेही भल्ला म्हणाले. 2022-23 या आर्थिक वर्षात भारताचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 20 टक्क्यांहून अधिक वाढून 19.68 लाख कोटी रुपये झाले आहे.

कर संकलन वाढवल्यानंतर आयकरदात्यांना अर्थसंकल्पात (Budget) टॅक्स स्लॅबमध्ये कपात होण्याची अपेक्षा होती. नंतर अर्थमंत्र्यांनी नवीन कर पद्धतीत बदल करुन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: अटल सेतूवर ऑईल सांडल्याने वाहनांचा थरार, सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या; सुदैवाने जीवितहानी टळली

जमीन वाचवा, गोवा वाचवा! पर्यावरणासाठी 'इनफ इज इनफ'चा एल्गार; राष्ट्रपतींच्या सूचनेनंतरही राज्य सरकार गप्प का? कुएल्हो यांचा सवाल

Iran Shopping Center Fire: इराणमध्ये शॉपिंग सेंटरला भीषण आग! 8 जणांचा होरपळून मृत्यू, 36 जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

'लुईस बर्जर'शी माझा संबंध नाही! चर्चिल आलेमाव यांचा पर्रीकरांवर खळबळजनक आरोप; ईडीची केस रद्द झाल्यावर दिली प्रतिक्रिया

Goa Parasailing Accident Video: गळ्याभोवती दोरी आवळली, श्वास कोंडला, मृत्यू समोर दिसला! गोव्यातील पॅरासेलिंगचा जीवघेणा थरार व्हायरल; महिलेनं सांगितली आपबिती

SCROLL FOR NEXT