Lamborghini Revuelto India Dainik Gomantak
अर्थविश्व

Video: पाहता क्षणीच प्रेमात पडाल... 9 कोटींची सुपर लक्झरी कार Lamborghini Revuelto भारतात लॉंच

कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत (एक्स-शोरूम) 8.89 कोटी रुपये ठेवली आहे. Automobili Lamborghini ची V12 इंजिनसह आपली पहिली प्लग-इन हायब्रिड सुपर स्पोर्ट्स कार आहे.

Ashutosh Masgaunde

Super luxury car Lamborghini Revuelto launched in India with a price tag of 9 crores:

सुपर लक्झरी कार उत्पादक Automobili Lamborghini ने नुकतेच मुंबईत आपली नवीन कार Lamborghini Revuelto सादर केली.

कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत (एक्स-शोरूम) 8.89 कोटी रुपये ठेवली आहे. Automobili Lamborghini ची V12 इंजिनसह आपली पहिली प्लग-इन हायब्रिड सुपर स्पोर्ट्स कार आहे.

कंपनीने म्हटले आहे की, 2024 नंतर भारतात वितरित केलेल्या जवळपास सर्व कार हायब्रिड असतील.

मिळालेल्या माहितीनुसार, Automobili Lamborghini ने सांगितले की, भारतातील मजबूत ऑर्डर बुक आणि उत्पादन पोर्टफोलिओमुळे देशांतर्गत बाजारपेठेत सतत वाढ नोंदवण्यात मदत होईल.

आशिया पॅसिफिकसाठी ऑटोमोबिली लॅम्बोर्गिनी क्षेत्राचे संचालक फ्रान्सिस्को स्कार्डोनी यांनी सांगितले की, भारतातील लॅम्बोर्गिनी ऑर्डर बँक व उत्पादन पोर्टफोलिओ मजबूत आहे. हे आम्हाला बाजारपेठेत वाढत राहण्यास संधी देईल.

कंपनीचे म्हणणे आहे की, भारत लॅम्बोर्गिनीसाठी सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि त्यांना देशात जोरदार मागणी आहे.

नवीन लॅम्बोर्गिनी रेव्हुल्टो कार हाइब्रिडाइजेशनच्या टप्प्यात सुपर स्पोर्ट्स कार विकासाच्या युगासाठी व्यासपीठ निर्माण करेल.

Scardaoni ने सांगितले की, पुढील वर्षाच्या सुरुवातीला, पहिले हायब्रिड प्लग-इन हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रीफाईड व्हेईकल (HPEV) भारतात सादर केले जाईल.

2024 मध्ये नवीन Urus हायब्रीड सादर केले जाईल आणि वर्षाच्या शेवटी आम्हाला नवीन V10 दिसेल. यानंतर 2025 मध्ये नवीन हुराकन हायब्रिड बाजारात आणता येईल.

लॅम्बोर्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल म्हणाले, “आमची पहिली हायब्रीड रिव्हुल्टो ही अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने आमच्या मुख्य धोरणातील पहिली पायरी आहे.

लक्झरी कारच्या विक्रीच्या बाबतीत भारतात सर्वाधिक टक्केवारी असल्याचे स्कार्डोनीने म्हटले आहे. हे प्रामुख्याने लक्झरी कार घेऊ शकतील अशा लोकांची संख्या मोठी असल्यामुळे आहे. आम्ही भारताच्या मार्केटच्या वाढीबद्दल खरोखर सकारात्मक आहोत आणि म्हणूनच आम्ही या मार्केटमध्ये खूप गुंतवणूक करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 07 July 2025: आरोग्यावर लक्ष द्या, खर्च वाढू शकतो; महत्त्वाच्या कामात यश मिळेल

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

SCROLL FOR NEXT