PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धीबाबत मोठी बातमी, PM मोदींनी ट्विट करुन दिली माहिती!

Central Government Latest News: जर तुम्हीही या योजनेत पैसे गुंतवले असतील किंवा तुम्ही तुमच्या मुलीसाठी खाते उघडणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Manish Jadhav

Sukanya Samriddhi Yojna: केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजनेबाबत मोठी माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हीही या योजनेत पैसे गुंतवले असतील किंवा तुम्ही तुमच्या मुलीसाठी खाते उघडणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आजकाल सुकन्या समृद्धी योजनेबाबत लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व व्यवहार करु शकता. हा निधी तुम्ही कुठेही वापरु शकता.

सरकारने माहिती दिली

माहिती देताना केंद्र सरकारने (Central Government) सांगितले की, या योजनेत आतापर्यंत सुमारे 3 कोटी खाती उघडण्यात आली असून गेल्या आठवड्यात 2 दिवसांत 10 लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. सध्या लोकांमध्ये या योजनेची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन अभिनंदन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही दोन दिवसांत 10 लाखांहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडल्याबद्दल इंडिया पोस्टचे अभिनंदन केले आहे. यामुळे देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

ही योजना 2015 मध्ये सुरु झाली

केंद्र सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरु केली आणि आतापर्यंत देशभरात सुमारे 2.73 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार या योजनेत दरवर्षी सुमारे 33 लाख खाती उघडली जातात.

फक्त 250 रुपयांमध्ये खाते उघडता येते

हे खाते दरमहा किमान रु.250 सह उघडता येते. त्याचबरोबर वर्षभरात जास्तीत जास्त दीड लाख रुपये त्यात जमा करता येतील. खाते उघडल्यानंतर त्यात 15 वर्षे पैसे जमा करता येतात.

15 लाख रुपये कसे मिळवायचे?

जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीसाठी दरमहा 3000 रुपये खाते उघडले तर 7.6 टक्के व्याजदराने 15 वर्षांत सुमारे 9 लाख रुपये जमा होतील. त्याचवेळी, त्याला 21 वर्षांनी सुमारे 15 लाख रुपये मिळतील.

याशिवाय, इक्विटी म्युच्युअल फंड, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, मनी बॅक इन्शुरन्स पॉलिसी योजना, मुदत ठेव, सोन्यात गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना, युनिट लिंक्ड विमा योजना याही मुलांच्या भविष्यासाठी उत्कृष्ट बचत योजना आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT