Success Story Of Wow Momo Founder Sagar Daryani Who Build Company Worth 2000 Crores:
भारतात गेल्या काही वर्षांपासून फास्ट फूडची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे आणि आज तुम्हाला पिझ्झा-बर्गर किंवा इतर फास्ट फूड खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही, तर ते प्रत्येक रस्त्यावर आणि चौकाचौकात सहज उपलब्ध होत आहेत.
पण आज आपन मोमोजबद्दल बोलत आहोत, जे सध्या पिझ्झा-बर्गरला थेट टक्कर देत आहेत. देशभरात मोमोजची बाजारपेठ कशी वाढली आहे याचे थेट उदाहरण म्हणजे Wow Momo ही मोमोज विकणारी कंपनी.
या कंपनीच्या सह-संस्थापकाची गोष्ट खूपच रंजक आहे, ज्याने मोमोज विकून 2000 कोटी रुपयांची कंपनी उभी केली.
प्रत्येक पालकांप्रमाणेच सागर दर्यानी यांच्या आई-वडिलांनाही आपल्या मुलाने शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी, अशी इच्छा होती, पण सागर काही वेगळाच विचार करत होता.
कोलकात्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना त्याला मोमोज विकण्याची कल्पना सुचली.
हा तो काळ होता जेव्हा मोमोज बहुतेक फक्त चायनीज फास्ट फूड म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपले प्लॅन्स घरच्यांसमोर मांडले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांना वाटले की जिथे लोकांना या फास्ट फूडबद्दल फारशी माहिती नाही तिथे मोमोजचा व्यवसाय कसा चालेल.
पण सागरने हार मानली नाही आणि पिझ्झा-बर्गरच्या जमान्यात 2008 मध्ये Wow Momo सुरू केली.
सागर यांचे मोमोजचा व्यवसाय करण्याचे विचार ऐकूण वडील संतापले. त्याने मुलाला टोमणा मारला आणि म्हणाले, 'माझा मुलगा मोमो विकणार.!' मात्र वडिलांचे हे टोमणेही सागरची पावले रोखू शकले नाहीत.
2008 मध्ये सागर आणि त्याचा मित्र विनोद कुमार यांनी एका छोट्या दुकानातून Wow Momo सुरू केली.
दोघांनीही प्रत्येकी ३०००० रुपये गुंतवले आणि फक्त १ सिंगल टेबल आणि २ पार्ट टाइम शेफ घेऊन व्यवसाय सुरू केला.
कोलकातामध्ये सागर दर्यानी यांनी त्यांचा मित्र विनोद कुमार यांच्यासोबत बी.कॉमचे शिक्षण घेत असताना सुरू केलेला हा व्यवसाय नावारुपाला येत होता.
यानंतर, जेव्हा लोकांना Wow Momo ची चव चाखायला मिळाली तेव्हा दुकानात गर्दी जमू लागली आणि काही वेळातच छोट्या दुकानाचे रूपांतर मोठ्या हॉटेलमध्ये झाले.
व्यवसाय वाढला पण पहिल्या दोन वर्षात पैसे आणि कामगारांच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, पण सागर दर्यानी यांनी हार मानली नाही. अशा परिस्थितीत सागर यांना
आपल्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी एक नवीन कल्पना सुचली. त्यांनी Wow Momo असे स्लोगन असलेले टी-शर्ट छापले आणि स्वत: आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना आउटलेटवर असताना ते घालायला सांगितले, इतकेच नाही तर लोकांना नाव ओळखावे म्हणून बाहेर पडतानाही त्यांनी टी-शर्ट घालायला सुरुवात केली.
तसेच यात व्हरायटी दाखवत त्यांनी तंदूरी मोमोज, कॉकलेज मोमोज, फ्राय मोमोज सारखे मोमोजचे इतर प्रकारांचीही विक्री सुरू केली. सागरची ही युक्ती कामी आली आणि त्याचे दुकान सुरू झाले.
एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला Wow Momo चा व्यवसाय आज देशभर पसरला आहे. आणि ही भारतीय कंपनी मॅकडोनाल्ड, केएफसी, डोमिनोज, पिझ्झा हट यांसारख्या फास्ट फूड चेनशी स्पर्धा करत बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहे.
देशभरातील 26 राज्यांमध्ये त्यांची 600 हून अधिक आऊटलेट्स आहेत आणि याच्या माध्यमातून दररोज 6 लाखांहून अधिक मोमोची विक्री होत आहे.
वॉव मोमोज कंपनीच्या मूल्यांकनाबद्दल बोलायचे तर, त्यांनी अंदाजे 2000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या आऊटलेट्सच्या माध्यमातून सागर आज लोकांना रोजगारही देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.