Success Story Of Shravan and Sanjay Kumaran Dainik Gomantak
अर्थविश्व

ज्या वयात तुमची आमची मुलं गेम खेळण्यात वेळ घालवतात त्या वयात कुमारन बंधूंनी उभी केली करोडोंची गेमिंग कंपनी

आतापर्यंत या दोघांनी 11 अ‍ॅप्स विकसित केले आहेत. त्यांची कंपनी गो डायमेंशन्सचे वार्षिक उत्पन्न 120 कोटी रुपये आहे.

Ashutosh Masgaunde

Success Story Of Shravan and Sanjay Kumaran Teenagers Who Built App Development Company Worth Crore Rupees:

स्वप्ने पाहण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी वयाचे बंधन नसते. माणसाला काही करायचे असेल तर तो काय साध्य करू शकत नाही? यासाठी कोणतेही वय, वेळ तुम्हाला थांबवू शकत नाही. श्रवण कुमारन आणि संजय कुमारन या दोन भावांनीही असाच काहीतरी पराक्रम केला आहे.

2012 मध्ये अवघे 14 आणि 12 वर्षांचे असताना, एवढ्या लहान वयात या दोन भावांनी भारतातील सर्वात तरुण उद्योजक होण्याचा मान मिळवला आहे. या दोन भावांनी मिळून 2012 मध्ये ‘डिझाइन डायमेंशन्स’ अ‍ॅप लाँच केले. आतापर्यंत या दोघांनी 11 अ‍ॅप्स विकसित केले आहेत. त्यांच्या कंपनी गो डायमेंशन्सचे वार्षिक उत्पन्न 120 कोटी रुपये आहे.

आई-वडिलांची प्रेरणा

श्रवण कुमारन आणि संजय कुमारन हे दोघे भाऊ चेन्नईचे आहेत. त्याचे वडील सुरेंद्रन कॉग्निझंट सॉफ्टवेअर कंपनीत असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट म्हणून काम करतात. त्यांची आई पत्रकार होती. दोन्ही भावांनी पहिले मोबाईल अ‍ॅप तयार केले तेव्हा ते सातवी आणि आठवीचे विद्यार्थी होते.

श्रावण आणि संजय सामान्य मुलांप्रमाणे शिकले होते. पण आई-वडिलांच्या प्रेरणेने दोघांनीही काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. त्याच्या वडिलांनी त्याला सुरुवातीपासूनच सांगितले होते की, तुम्ही स्वत:ची ओळख निर्माण करा.

‘गो डायमेंशन’चा श्रीगणेशा

तंत्रज्ञान प्रेमी असलेले दोन्ही बंधू याविषयी सतत काहीतरी शोधत असायचे. दरम्यान त्यांना अ‍ॅपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांच्याबद्दल माहिती मिळाली. दोघेही त्यांच्यावर विशेष प्रभावित झाले. यानंतर दोघांनीही सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही भावांनी ही बाब त्यांच्या वडिलांना सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी दोघांनाही शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न केला.

श्रवण आणि संजयने पुस्तकांच्या माध्यमातून सॉफ्टवेअरची सर्व माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यांनी वडिलांना या क्षेत्राशी संबंधित पुस्तके मागवण्यास सांगितले. ते दररोज शाळेत जायचे आणि मग मोकळ्या वेळेत पुस्तके वाचायचे. यामुळे त्यांना कमी वेळात जास्त ज्ञान मिळाले. त्यानंतर या दोन्ही भावांनी 2012 मध्ये ‘गो डायमेंशन’ नावाची कंपनी स्थापन केली. त्यांच्या कंपनीच्या स्थापनेमुळे हे दोघे भाऊ भारतातील सर्वात तरुण उद्योजक बनले. त्यावेळी दोघेही 13 आणि 11 वर्षांचे होते.

'कॅच मी कॉप'

एवढेच नाही तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी या दोन भावांनी 'कॅच मी कॉप' नावाचे अ‍ॅप्लिकेशन तयार केले. ज्याद्वारे गुन्हेगारांना पकडण्यात मदत होईल. मात्र हे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यापूर्वी या दोन भावांना 150 वेळा अपयशाचा सामना करावा लागला. पण तरीही त्यांनी प्रयत्न न सोडता अ‍ॅप्लिकेशन तयार केले.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून या दोन भावांना हे अ‍ॅप्लिकेशन बनवण्याची कल्पना सुचली. हे दोन भाऊ त्यांचे पहिले अ‍ॅप्लिकेशन तयार केल्यानंतर थांबले नाहीत. वडिलांच्या मदतीने त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगती केली आहे.

समाजकार्य

या दोन भावांनी अ‍ॅपल आणि अँड्रॉइड या दोन्हींसाठी अ‍ॅप्लिकेशन्स तयार केली आहेत. यानंतर दोघांनी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमध्येही काम करायला सुरुवात केली. या क्षेत्रात त्यांनी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी जिओवीर नावाचा हेडसेटही तयार केला. त्याची खासियत म्हणजे हे इतर व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी उपकरणांच्या तुलनेत पाचपट स्वस्त आहे आणि त्यासारखेच काम करते.

श्रावण आणि संजय सामाजिक कार्यातही सहभागी आहेत. हे दोन्ही भाऊ त्यांच्या कमाईतील १५ टक्के रक्कम दान करतात.

यशोगाथा

समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने या दोन भावांनी 'गो डोनेट' नावाचे अ‍ॅप्लिकेशन तयार केले. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे उरलेले अन्न गरीब मुलांपर्यंत सहज पोहोचवता येते. आतापर्यंत दोघांनी मिळून १२ अ‍ॅप्लिकेशन्स विकसित केले आहेत.

या दोन भावांच्या प्रतिभेची आज सर्वांनाच भुरळ पडली आहे. त्यांच्या प्रतिभेमुळे, दोन्ही भावांनी IIM-बेंगलोर आणि TEDxT परिषदांमध्ये बोलण्याची संधी मिळाली आहे. या दोन भावांनी आपल्या नवीन विचार आणि मेहनतीच्या जोरावर आपली यशोगाथा लिहिली आहे. श्रावण आणि संजयची ही कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Goa Live Updates: धारगळमध्‍ये होणार यंदाचा ‘आयुर्वेद दिन’

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT