MrBeast World's Most Subscribed YouTube Channel. Dainik Gomantak
अर्थविश्व

Richest Youtuber: वयाच्या 25 व्या वर्षी 820 कोटींचे साम्राज्य, गोष्ट जगातील सर्वात श्रीमंत युट्युबरची

Ashutosh Masgaunde

Success Story Of MrBeast, World's Most Subscribed YouTube Channel: केवळ अभ्यास,नोकरी किंवा व्यवसाय करूनच करिअर घडते असे नाही. आजच्या युगात नाव आणि पैसा तुमच्या कौशल्याने आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरही कमावता येतो.

25 वर्षीय अमेरिकन तरुणाने असेच काहीसे केले आहे. त्याने ना नोकरी केली ना कोणता व्यवसाय केला, पण त्याच्या कौशल्यामुळे तो जगातील नंबर वन YouTuber बनला आणि आज तो 820 कोटींचा मालक आहे.

कोण आहे जिमी डोनाल्डसन उर्फ ​​मिस्टर बीस्ट

जिमी डोनाल्डसन उर्फ मिस्टर बीस्ट, एक ऑनलाइन कन्टेन्ट क्रिएटर आणि जगातील सर्वात श्रीमंतर YouTuber आहे. सध्या, यूट्युबर त्याचे सर्वाधिक सब्सक्रायबर्स देखील आहेत.

तो अमेरिकेचा असून, 10 कोटी फॉलोअर्सपर्यंत पोहोचणारा YouTube च्या इतिहासातील दुसरा व्यक्ती आहे. सध्या यूट्युबवर त्याचे 17 कोटी 80 लाख सब्सक्रायबर्स आहेत.

मिस्टर बीस्ट स्टंट आणि समुदाय सेवेचा प्रचार करणारे व्हिडिओ बनवत असतो. आणि त्याच्या कमाईतील जास्तीत जास्त रक्कम विविध समाजोपयोगी कामांसाठी दान करतो.

मिस्टर बीस्ट कमाईतील जास्तीत जास्त रक्कम विविध समाजोपयोगी कामांसाठी दान करतो

मिस्टर बीस्ट का प्रसिद्ध आहे?

जिमी डोनाल्डसन (Jimmy Donaldson) उर्फ मिस्टर बीस्ट त्याच्या YouTube चॅनेलवर धाडसी अप्रतिम स्टंट व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी ओळखला जातो.

मिस्टर बीस्ट त्याच्या धर्मादाय कामांसाठी आणि महागड्या भेटवस्तूंसाठी देखील ओळखला जातो. त्याची एक समाजसोवी संस्था देखील आहे, जी अमेरिकेत गरजू लोकांना अन्न पुरवते.

2021 मध्ये त्याने खास समाजसेवी कार्याचा प्रसार करण्याठी एक नवीन YouTube चॅनल सुरू केले ज्याचे सब्सक्रायबर्स 1 कोटीहून अधिक सदस्य आहेत.

2021 मध्ये 400 कोटींची कमाई

फोर्ब्सने (Forbes) आपल्या अहवालात म्हटले आहे की मिस्टर बीस्ट यूट्यूबवरून सर्वाधिक कमाई करणारा यूट्यूबर आहे. त्याने 2021 मध्ये YouTube वरून 400 कोटींहून अधिक कमाई केली होती.

मिस्टर बीस्टचे आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ एकत्र केले तर त्याला एकूण 1500 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

मिस्टर बीस्टचे आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ एकत्र केले तर त्याला एकूण 1500 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

मिस्टर बीस्टचे आता किती सब्सक्रायबर्स आहेत?

YouTuber pewdiepie (Felix Kjellberg) चे 2019 मध्ये 10 कोटींपेक्षा पेक्षा जास्त सब्सक्रायबर्स होते. त्यावेळी सर्वाधिक सब्सक्रायबर्स हा विक्रम होता.

पण डिसेंबर 2022 मध्ये, मिस्टर बीस्टने फेलिक्स केजेलबर्गचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मिस्टर बीस्टचे आता 17 कोटी 85 लाख सब्सक्रायबर्स आहेत.

लाइफस्टाइल

मिस्टर बीस्टचे बरेच YouTube चॅनेल आहेत. यासोबतच त्याने आपले गेमिंग अॅप आणि रेस्टॉरंट चेनही सुरू केली. आज तो जगातील सर्वात श्रीमंत YouTuber म्हणून ओळखला जातो.

सध्या त्याची संपत्ती 820 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी अनेक घरे आहेत. तसेच त्याच्याकडे BMW, Tesla सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT