Stock Market On High Sensex near 58 thousand, nifty open with green mark  Dainik Gomantak
अर्थविश्व

शेअर बाजाराने गाठला नवा उंच्चांक सेन्सेक्स 58 हजाराच्या जवळ

देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) आजही जोरदार तेजी कायमच असलेली पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) आजही जोरदार तेजी कायमच असलेली पाहायला मिळत आहे. बुधवारीही सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीच्या (Nifty) सुरुवातीच्या व्यापारात बरीच खरेदी झालेली पाहायला मिळाली होती. यासह या दोन्ही बेंचमार्कने नवीन उच्चांक गाठला आहे . बीएसईच्या (BSE) 30 शेअर्सवर आधारित सेन्सेक्स सकाळी 09:53 वाजता 248.21 अंकांच्या उंच्चांकावर 57,800 अंकावर पोहोचला होता तर एनएसई (NSE) निफ्टी 61.90 अंकाच्या वाढीसह 17,194.10 अंकांच्या पातळीवर पोहोचला होता. (Stock Market On High Sensex near 58 thousand, nifty open with green mark)

ॲक्सिस बँकेच्या (Axis Bank) शेअर्समध्ये सेन्सेक्सवर सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. याशिवाय एशियन पेंट्स (Asian Paints), इंडसइंड बँक (IndusInd Bank ), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), बजाज ऑटोच्या शेअर्समध्येही बरीच वाढ पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त, एचयूएल, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, एसबीआय, एचडीएफसी बँक, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड आणि डॉ रेड्डी यांचे शेअर्स देखील पोहोचले आहेत.

दुसरीकडे, टाटा स्टील, मारुती, भारती एअरटेल, एम अँड एम, इन्फोसिसचे शेअर्स मात्र काही प्रमाणात मंदी दिसून अली आहे.

कालच देशाचे जीडीपीचे आकडे समोर आले आहेत. कोरोना महामारीच्या नंतर देशाच्या जीडीपीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मंगळवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जीडीपीची आकडेवारी जाहीर केली. चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीची म्हणजेच एप्रिल-जूनची आकडेवारी दर्शवते की जीडीपी वाढीचा दर 20.1 टक्के इतका आहे.

चीनपेक्षा हा अधिक चांगला आकडा आहे कारण चीनने पहिल्या तिमाहीत 7.9 टक्के वाढ नोंदवली आहे. म्हणजेच, असे मानले जाऊ शकते की भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा वेगाने सुधारली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक (एफडीआय) सातत्याने वाढत आहे, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात तेजी आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया देखील मजबूत झाला, तसेच गुंतवणूकदारांमध्ये कोरोनाची भीती लसीकरणामुळे संपलेली दिसते. या व्यतिरिक्त, ऑटो विक्रीच्या क्षेत्रातही यामुळे उसळी पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT