Stock Market on high, Sensex crossed 56 thousand Dainik Gomantak
अर्थविश्व

शेअर बाजाराने गाठला नवा उच्चांक, सेन्सेक्स 56 हजारच्या पार

आज ट्रेडिंग सुरू असतानाच सेन्सेक्स (Sensex) 56,086 अंकांच्या विक्रमी पातळीवर गेला आहे .

दैनिक गोमन्तक

बुधवारी शेअर बाजाराने (Share Market) नवा उच्चांक गाठलेला पाहायला मिळाला .आज ट्रेडिंग सुरू असतानाच सेन्सेक्स (Sensex) 56,086 अंकांच्या विक्रमी पातळीवर गेला आहे . आजचे मार्केट सुद्धा 56,073 या एका नवीन आकड्याने सुरू झाले होते . एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) शेअर्स सकाळीच 2 टक्क्यांनी वाढलेले पहायला मिळाले .सेन्सेक्स मध्ये समाविष्ट असलेल्या 30 कंपन्यांचे बहुतेक शेअर्स ग्रीन झालेले पाहायला मिळाले. त्याच वेळी, निफ्टी 50 (Nifty 50) नेही बाजार उघडल्याबरोबर 16,693 अंकांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला आहे निफ्टी 50 व्यवसायाची सुरुवात 16691 गुणांनी झाली आहे.(Stock Market on high, Sensex crossed 56 thousand)

तत्पूर्वी मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीचे नवे विक्रम करण्याची प्रक्रिया सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात सुरूच राहिली होती.आयटी, एफएमसीजी आणि फार्मा शेअर्समधील खरेदीमुळे जागतिक ट्रेंडमध्ये बाजाराला गती मिळाली. बीएसईच्या 30 शेअर सेन्सेक्सने दिवसभराच्या व्यवहारादरम्यान 55,854.88 अंकांच्या आपल्या नवीन सर्व उच्चांकी पातळीवर पोहचला होता . नंतर, सेन्सेक्स 209.69 अंक किंवा 0.38 टक्के वाढून 55,792.27 च्या नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला होता.

त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 51.55 अंकाने वाढून 16,614.60 अंकांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झालेला पाह्यला मिळाला . काल ट्रेडिंग दरम्यान निफ्टीने 16,628.55 अंकांच्या आपल्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला होता.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टेक महिंद्राचा शेअर तीन टक्क्यांहून अधिक चढला. टीसीएस, नेस्ले इंडिया, इन्फोसिस आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्सही वाढले आहेत.

तर दुसरीकडे इंडसइंड बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, एल अँड टी आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स घसरले. सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी 18 कंपन्यांचे शेअर्स नफेत 12 कंपन्यांचे शेअर्स तोतामध्ये बंद झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT