सीरमने विकत घेतला 'या' कंपनीचा 50 टक्के हिस्सा

सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) त्याच्या संयुक्त उद्योगामध्ये भागीदार होण्यासाठी आणि फार्मा पॅकेजिंग (Pharma Product) पुरवठा सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
Serum Institute acquires 50% stake of SCHOTT Kaisha
Serum Institute acquires 50% stake of SCHOTT KaishaDainik Gomantak
Published on
Updated on

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute Of India) ने स्कॉट कैशाचा (SCHOTT Kaisha) 50 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने (SII) त्याच्या संयुक्त उद्योगामध्ये भागीदार होण्यासाठी आणि फार्मा पॅकेजिंग (Pharma Product) पुरवठा सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. याची घोषणा करताना संस्थेचे सीईओअदार पूनावाला Adar Poonawalla)म्हणाले, “पुरवठा साखळी सुरक्षित करणे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे ... दीर्घकालीन ग्राहक म्हणून, आम्ही त्यांच्या कुपी आणि सिरिंजचा वापर कोविशील्डसह लस साठवण्यासाठी करतो."

SCHOTT ही एक कंपनी आहे जी प्रमुख लस उत्पादकांना जागतिक स्तरावर काचेच्या लहान बाटल्या पुरवते. (Serum Institute acquires 50% stake of SCHOTT Kaisha)

स्कॉट कैशा कंपनी देशातील फार्मास्युटिकल इंजेक्शन्ससाठी ट्यूबलर ग्लासपासून बनवलेल्या प्राथमिक पॅकेजिंगचा प्रमुख पुरवठादार आहे. कंपनीची स्थापना 1990 मध्ये कैशा मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने मुंबईत चांगल्या दर्जाचे फार्मास्युटिकल उत्पादक म्हणून करण्यात आली होती .उल्लेखनीय म्हणजे, 2008 मध्ये, कैशाने जर्मनीच्या स्कॉट (SCHOTT), एक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान समूह आणि फार्मास्युटिकल पॅकेजिंगच्या जगातील अग्रगण्य उत्पादकासोबत हात मिळवला होता . आणि आता स्कॉटचे मुख्यालय मेनझ, जर्मनी येथे आहे.

Serum Institute acquires 50% stake of SCHOTT Kaisha
अदानी ग्रुपची महाराष्ट्राच्या या बड्या कंपनीत कोटींची गुंतवणूक

या करारासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूट आणि स्कॉट कैशा या कंपनीने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात कोणतीही आर्थिक माहिती प्रसिद्ध केलेली नाही. स्कॉट कैशा या कंपनीतर्फे या अगोदर सांगण्यात आले होते की , 2021-22 या वर्षासाठी, आम्ही कोविड -19 लस समाविष्ट करण्यासाठी 38 कोटीहून अधिक लहान आकाराच्या बाटल्या विकण्याची आम्ही अपेक्षा करतो आहे . गेल्या वर्षी ही संख्या 11 कोटींपेक्षा थोडी जास्त होती.

दरम्यान या करारानंतर "भारताने जागतिक औषधी केंद्र म्हणून सातत्याने आपले स्थान प्रस्थापित केल्यामुळे, आम्ही भारतीय फार्मा पुरवठा साखळीमध्ये आपले पाऊल मजबूत करण्यास आनंदित आहोत. आम्ही या भागीदारीतून मजबूत आवेगांची अपेक्षा करत आहोत."अशे मत SCHOTT चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ फ्रँक हेनरिक्ट यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com